मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

इस्रायलमध्ये सापडला नव्या धोकादायक व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, लसीकरण होऊनही झालं Infection

इस्रायलमध्ये सापडला नव्या धोकादायक व्हेरिएंटचा पहिला रुग्ण, लसीकरण होऊनही झालं Infection

जगात सर्वात जलद लसीकरण पूर्ण केलेल्या इस्रायलमध्ये कोरोनाच्या (New variant of corona virus enters Israel) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.

जगात सर्वात जलद लसीकरण पूर्ण केलेल्या इस्रायलमध्ये कोरोनाच्या (New variant of corona virus enters Israel) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.

जगात सर्वात जलद लसीकरण पूर्ण केलेल्या इस्रायलमध्ये कोरोनाच्या (New variant of corona virus enters Israel) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.

  • Published by:  desk news

जेरुसलेम, 26 नोव्हेंबर: जगात सर्वात जलद लसीकरण पूर्ण केलेल्या इस्रायलमध्ये कोरोनाच्या (New variant of corona virus enters Israel) नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. B.1.1.529 व्हेरिएंटने बाधित असलेला पहिला रुग्ण इस्रायलमध्ये सापडला असून त्यापाठोपाठ (Total of three infected with new variant) आणखी दोघांनाही याच विषाणूचा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अफ्रिकेतील हा व्हेरिएंट आता इस्रायलमध्येही पोहोचल्याचं दिसून आलं आहे.

मलावीवरून येताना झालं इन्फेक्शन

ज्या व्यक्तीला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने घेरलं आहे, ती व्यक्ती मलावीवरून परत येत होती. इस्रायलमध्ये लँड झाल्यावर विमानतळावर करण्यात आलेल्या चाचणीत या व्यक्तीला कोरोनाच बाधा झाल्याचं दिसून आलं. अफ्रिकन देशातून ही व्यक्ती आल्यामुळे कोरोनाचा व्हेरिएंट तपासला असता हा नवा व्हेरिएंट असल्याचं दिसून आलं आहे. या व्यक्तीसोबत आणखी दोघांना नव्या व्हेरिएंटनची लागण झाली असून सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

तरुणांसाठी घातक विषाणू

B.1.1.529 हा नवा व्हेरिएंट तरुणांसाठी घातक असल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः 25 वर्षे वयापेक्षा लहान व्यक्तींना या व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका असल्याचं दिसून आलं आहे. सर्वप्रथम हा व्हेरिएंट दक्षिण अफ्रिकेत आढळून आला होता. जागतिक आरोग्य संघनेनं या व्हेरिएंटला अद्याप नाव दिलेलं नाही. मात्र अल्फा, बिटा, डेल्टा यासारखं एखादं ग्रीक नाव नव्या व्हेरिएंटला लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हे वाचा- दक्षिण आफ्रिका-बोत्स्वानामध्ये नवीन विषाणूचा कहर! WHO ने बोलावली उच्चस्तरीय बैठक

अफ्रिकेतील विमानसेवा बंद

नव्या व्हेरिएंटचा रुग्ण अद्याप भारतात आढळून आलेला नाही. अफ्रिकेबाहेर अद्याप या नव्या व्हेरिएंटचा फारसा शिरकाव झालेला नाही. त्यामुळे अफ्रिकेतून येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानसेवेवर तात्पुरती स्थगिती घालण्याचा विचार युरोपियन युनियन करत असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हेरिएंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्यामुळे कोरोनाच्या नव्या लाटेचं हा विषाणू कारण ठरू शकतो, असा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Israel