• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • फक्त रूपच नाही तर लक्षणंही बदलली; असे आहेत Delta Plus Corona Symptoms

फक्त रूपच नाही तर लक्षणंही बदलली; असे आहेत Delta Plus Corona Symptoms

कोरोनाचा डेल्टा प्लस हा नवा अवतार आता जगभरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असताना त्याची लक्षणंही बदलल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : जगात गेल्या दीड वर्षांपासून धुमाकूळ घालणारा कोरोनाचा विषाणू (Corona Virus) हा दर काही महिन्यांनी नवा अवतार (Mutation) धारण करतो. त्यामुळे कोरोनाची लागण झाली आहे, हे समजणारी प्राथमिक लक्षणंही (Symptoms) बदलत गेल्याचं दिसून येतं. कोरोनाचा डेल्टा प्लस (Delta Plus) हा नवा अवतार आता जगभरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असताना त्याची लक्षणंही बदलल्याचं याविषयीच्या अभ्यासगट ‘झो’नं (ZOE)  म्हटलंय. कोरोनाची लक्षणं आणि लसीकरण याचा अभ्यास करणाऱ्या ZOE या गटातील एक अभ्यासक प्रा. स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लसची लागण झाल्याची काही समान लक्षणं रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. डोकं दुखणं, घशात खवखवणं आणि नाक वाहणं ही डेल्टा प्लसची सर्वांमध्ये आढळून येणारी लक्षणं असल्याचं दिसून आलं आहे. ब्रिटनमध्ये अनेकांना अचानक हुडहुडी भरत असल्याचा अनुभवदेखील आला आहे. कोरोनाच्या विषाणूचा अवतार बदलेल तशी जुनी लक्षणं कमी होत जातात आणि नव्या लक्षणांमध्ये भर पडते, असं निरीक्षण प्रा. स्पेक्टर यांनी नोंदवलं आहे. ही लक्षणं दिसताच सावध व्हा ब्रिटनमध्ये ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेला, त्यांना दिसलेल्या लक्षणांचे तपशील एका ऍपवर नोंदवायला सांगण्यात आलं होतं. त्यावेळी नागरिकांनी नोंदवलेल्या लक्षणांपैकी काही कॉमन लक्षणांवर बारीक नजर ठेवणं गरजेचं असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात. अनेकांना बाहेर थंड हवा वाहत असल्यामुळे आपल्याला थंडी वाजते, असं वाटतं. मात्र ते कोरोनाच्या डेल्टा प्लसची लागण झाल्याचंही लक्षण असू शकतं. त्याशिवाय डोकेदुखी, घशात खवखव, सतत खोकला येणं, वास आणि चयामुव जाणं ही लक्षणं सारखीच असली तरी त्यांच्या तीव्रतेत फरक पडल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा -...तर दुसरा डोस 45 आठवड्यांनंतर; आणखी वाढणार कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर? लसीकरण हाच उपाय कोरोनाच्या या नव्या अवताराचा सर्वाधिक फटका लसीकरण न झालेल्या नागरिकांना बसत असल्याचं आतापर्यंतच्या अनुभवातून समोर आलं आहे. विशेषतः लसीकरण झालेल्या आणि पन्नाशीच्या आतील एकाही नागरिकाला ब्रिटनमध्ये डेल्टा प्लसची लागण झालेली नाही. लसीकरण पूर्ण झालेल्यांना लागण होण्याचं प्रमाण लस न घेतलेल्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण होणे, हाच सध्या तरी डेल्टा प्लसला रोखण्याचा उत्तरम मार्ग असल्याचं सांगितलं जात आहे.
  Published by:desk news
  First published: