नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) संक्रमणाबाबत एक नवा रिपोर्ट समोर आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, ज्या रुग्णांच्या शरीरात कोरोनाविरुद्ध अॅंटीबॉडीज तयार झाली आहेत, त्यांना दुसर्यांदा संसर्ग होण्याचा धोका नाही आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, अमेरिकेच्या सिएटल येथून मासेमारी करणारे जहाज निघाले होते, त्यात असेच 3 लोक सापडले. हे रिपोर्ट त्या मासेमारी करणाऱ्या लोकांचे आहेत, मासेमारीचे जहाज सिएटल येथून सुटण्यापूर्वी आणि नंतर घेतलेल्या अँटीबॉडीजसह आरटी-पीसीआर चाचण्यांवर आधारित आहेत. 18 दिवसांत या जहाजावरील 122 सदस्यांपैकी 104 जणांना एकाच स्त्रोतामुळे कोरोनाची लागण झाली होती.
हे संशोधन शुक्रवारी प्रीप्रिंट सर्व्हर मेड्रिक्सवर प्रकाशित झाले आहे. हे संशोधन वॉशिंग्टन विद्यापीठ आणि सिएटलच्या फ्रेड हच कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी केले आहे.
वाचा-हिवाळ्यात कोरोनासोबत 'या' रोगाचाही होणार अटॅक, शास्त्रज्ञांचा इशारा
या संशोधनाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत कारण रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लस वापरण्याची जगातील मुख्य रणनीती प्रत्यक्षात साथीच्या आजारापासून बचाव करण्यासाठी कार्य करू शकते या वस्तुस्थितीचे त्यांनी बारकाईने समर्थन केले आहे. रोगापासून बचाव करण्यासाठी अँटीबॉडीज पुरेसे आहेत की नाही तसेच, त्यांचे परिणाम यांचा अभ्यास केला जात आहे.
वाचा-देशातील मृतांचा आकडा पोहचला 50 हजारांच्या घरात, 24 तासांतील चिंतादायक आकडेवारी
संशोधनात असे म्हटले आहे की एकूण 104 जणांची आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह व्हायरल टेस्ट झाली होती. यामुळे समुद्री जंतुसंसर्गाच्या हल्ल्यात 85.2% वाढ होते. जहाजात उपस्थित असलेल्या केवळ तीन जणांची सेरोलॉजिकल तपासणी करण्यात आली. पहिल्या संसर्गामुळे तो बरा झाला असल्याचे आढळून आले. जेव्हा जहाजात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरला तेव्हा या तिघांना काहीही झाले नाही. कोरोनाची लक्षणेही त्यांच्याच दिसली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india