मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनातून बरं झाल्यानंतर अँटीबॉडीच ठरतायेत लहान मुलांसाठी घातक? डॉक्टरांनी सांगितले परिणाम

कोरोनातून बरं झाल्यानंतर अँटीबॉडीच ठरतायेत लहान मुलांसाठी घातक? डॉक्टरांनी सांगितले परिणाम

कोरोनातून बरं होणाऱ्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (MIS-C) आढळत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.

कोरोनातून बरं होणाऱ्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (MIS-C) आढळत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.

कोरोनातून बरं होणाऱ्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (MIS-C) आढळत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो.

बंगळुरु 23 मे : कोरोनापाठोपाठ (Coronavirus) आता लहान मुलांमध्ये आढळून येत असलेल्या नव्या आजारानं आणखीच चिंता वाढवली आहे. कोरोनातून बरं होणाऱ्या लहान मुलांमध्ये ‘मल्टी-सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’ (MIS-C) आढळत असल्यानं चिंतेत भर पडली आहे. याचा शरीराच्या अनेक भागांवर परिणाम होतो. तसंच कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेक आठवड्यांनी याचे परिणाम जाणवू लागतात.

कोरोनातून बरं झालेल्या मुलांमध्ये ‘मल्टी- सिस्टम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम’चा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो. फोर्टिस हेल्थकेअरमध्ये बालरोगतज्तज्ञ असलेल्या डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं, की मी हे सांगू शकत नाही की यामुळे जिवाला धोका आहे का. मात्र, हा संसर्ग निश्चितपणे मुलांना अतिशय वाईट पद्धतीनं आपल्या विळख्यात घेतो. तो मुलांच्या हृदय (Heart), यकृत आणि किडनीवर (kidneys) थेट परिणाम करू शकतो.

डॉ. योगेश यांनी सांगितलं, की हा आजार मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी होतो. ते म्हणाले, की कोरोनाबाबत अनेकजण जास्त काळजी करत नाहीत. कारण,बहुतेकांमध्ये याची हलकी लक्षणं दिसतात किंवा काहींना याचा फार त्रास होत नाही. मात्र, कोरोनामुळे लहान मुलांमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीच अधिक घातक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अँटीबॉडीचा परिणाम लहान मुलांच्या शरीरावर होतो. यामुळे त्यांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते.

डॉक्टर गुप्ता यांनी सांगितलं, की मागील वर्षी अशी तीन प्रकरणं समोर आली होती. तर, दुसऱ्या लाटेत याची दोन प्रकरणं समोर आली आहेत. भविष्यात कोरोनाचा प्रसार आणखी वाढल्यास या प्रकरणांमध्येही अधिक वाढ होऊ शकते, असं डॉ. योगेश यांनी म्हटलं. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियामध्ये महामारी विशेषतज्ज्ञ असलेल्या डॉ. गिरिधर आर. बाबू यांनी सांगितलं, की या प्रकरणावर अभ्यास करणं गरजेचं आहे. सध्या प्रकरणं कमी असली तरीही तिसऱ्या लाटेआधी याबाबतची संपूर्ण माहिती आपल्याकडे असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं.

First published:

Tags: Corona updates, Serious diseases, Small child