ब्लॅक फंगसनंतर कोरोनाचे आता नवे परिणाम; शरीरावर सूज येण्यासह दिसतायेत अनेक नवीन लक्षणं

ब्लॅक फंगसनंतर कोरोनाचे आता नवे परिणाम; शरीरावर सूज येण्यासह दिसतायेत अनेक नवीन लक्षणं

सध्या जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Virus Second Wave) थैमान घातलं असून भारतात (India) या लाटेत कोरोना झाल्यानंतर ब्लॅक फंगस (Black Fungus) हा आजार होण्याच्या घटना घडत आहेत. अशात आता आणखी एक नवा आजार समोर आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 17 मे : संपूर्ण जग गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या संसर्गाशी (Corona Virus Infection) लढा देत आहे. अजूनही यातून संपूर्ण सुटका झालेली नाही. ज्याची कधी कोणी कल्पनाही केली नसेल अशी परिस्थिती जग अनुभवत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाउन (Lockdown) लावावा लागला. आजही लॉकडाऊन सदृश्य कडक निर्बंध लागू आहेत. सगळ्या जगाची गतीच यामुळे मंदावली आहे. लाखोंच्या संख्येनं लोक या आजारानं मरण पावले असून आजही जगभरात दररोज लाखो लोकांना या आजाराची लागण होत आहे. कोरोनाचा विषाणू थोड्या थोड्या काळानंतर स्वतःच्या संरचनेत बदल घडवत नवीन आव्हाने उभी करत आहे. अर्थात आता लस आल्यानं थोडासा दिलासा मिळाला असला तरी सगळ्यांचे लसीकरण होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागणार आहे. त्या दरम्यान या विषाणूच्या संसर्गाशी लढावं लागणार आहे.

सध्या जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Virus Second Wave) थैमान घातलं असून भारतात (India) या लाटेत कोरोना झाल्यानंतर ब्लॅक फंगस (Black Fungus) हा आजार होण्याच्या घटना घडत आहेत. या आजारात अनेक नवीन लक्षणे दिसत आहेत. ब्रिटनमधील इव्हिलीना लंडन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये (Evelina London Children Hospital) कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये या आजाराची आणखी नवीन लक्षणे आढळली असून यामध्ये मुलांच्या शरीरावर सूज येऊन त्यांचं हृदय अचानक बंद होत आहे.

लहान मुलं होत आहेत शिकार :

कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या सुरूवातीला कावासाकी (Kawasaki Disease) या आजाराची लक्षणे बर्‍याच मुलांमध्ये दिसून आली. यामध्ये मुलांच्या शरीरावर चट्टे येत असत. यामुळे काही मुलांचा जीवही गेला. आता ब्रिटनमध्ये मुलांमध्ये आणखी एक नवीन आजार दिसून येत आहे. 6 वर्षाचा ऑलिव्हर पॅटरसन (Oliver Patterson) या आजाराचा पहिला रुग्ण ठरला आहे. कोरोनाशी संबधित हा आजार असल्याचं सांगितलं जात आहे. ऑलिव्हरच्या शरीरावर भाजल्यासारखे चट्टे उमटले असून त्याच्या हृदयाचे स्नायू (Heart’s Mussels)आकुंचन पावत आहेत. त्यामुळे तो मरणाच्या दारात पोहोचला आहे. त्याच्या आईनं अचानक त्याच्या शरीरावर चट्टे उमटल्याचं पाहताच त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

डॉक्टरांनी तत्काळ ऑलिव्हरला आयसीयूमध्ये ठेवत त्याच्यावर उपचार सुरू केले. अतिशय गंभीर अवस्था असलेल्या ऑलिव्हरनं मृत्यूशी कडवी झुंज देत त्याला परतवून लावले. लहान मुलांमध्ये उद्भवणाऱ्या या विचित्र आजाराची लोकांना माहिती व्हावी यासाठी ऑलिव्हरची आई लॉरा हिनं त्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑलिव्हरची अवस्था लोकांसमोर आणली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 17, 2021, 3:36 PM IST

ताज्या बातम्या