नवी दिल्ली, 29 मार्च: जगातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये 'डेल्टाक्रॉन' (Deltacron) व्हेरिएंटनं (variant) चिंता वाढवली आहे. असं म्हटलं जात आहे की, या व्हेरिएंटमध्ये डेल्टा आणि ओमायक्रॉनची लक्षणं आहेत. तज्ज्ञ म्हणतात की, अशा संकरित व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणं आवश्यक आहे, ते दोन्ही स्वरूपातील गोष्टी शोधून सुपरव्हायरसमध्ये बदलू शकतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वॉशिंग्टनमधील पब्लिक हेल्थ लॅबोरेटरीमधील जैव सूचनाशास्त्रज्ञ स्कॉट नुयेन म्हणतात की, असे दिसून येत आहे की हा व्हेरिएंट कॉम्बिनेशनचा अधिक चांगला वापर करत आहे. हे रीकॉम्बिनंट व्हेरिएंट्स पुढील वेळी व्हायरस कसा विकसित होणार आहे याबद्दल अधिक चांगली माहिती देऊ शकतात.
डेल्टाक्रॉन व्हेरिएंट प्रथम सायप्रसमधील कोविड-19 असलेल्या रुग्णांमध्ये आढळून आला. न्युयेनला आढळलं की, नमुन्यात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्हायरसमध्ये दोन भिन्न प्रकारांसाठी जीन्स आहेत. शास्त्रज्ञ या स्थितीला 'रिकॉम्बीनंट' म्हणतात.
एक आघात आणि कुटुंब विखुरलं; जवानाच्या आत्महत्येनंतर बायकोनं स्वत:ला पेटवलं, तर भावाला...
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे डॉक्टर माईक रेयान यांनी सांगितलं की, रिकॉम्बीनंट म्हणजे जेव्हा दोन व्हायरस एकाच व्यक्तीला किंवा प्राण्याला संक्रमित करतात आणि त्यानंतर काय होते. प्रभावीपणे दोन व्हायरस मोठ्या प्रमाणात अनुवांशिक माहिती सामायिक करतात आणि दुसरीकडे प्रभावीपणे एक नवीन व्हायरस तयार होऊ शकतो. अशा प्रकारे आपण इंन्फ्लूएंझा साथीचा रोग निर्माण केला होता. ते पुढे म्हणाले की, व्हायरस जितका जास्त पसरेल, तितक्या त्याला जास्त बदलण्याची संधी मिळेल.
तज्ज्ञ म्हणतात की, रिकॉम्बिनंट व्हायरस घाबरण्याचे कारण नसावं. दरम्यान कोरोना व्हायरसच्या वाढीची माहिती मिळविण्यासाठी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
नुयेन म्हणाले, महामारीच्या सुरूवातीस, आम्ही सर्वजण आशा करत होतो की SARS-CoV-2 मध्ये जास्त बदल होणार नाही. पण या व्हायरसने आम्हाला सर्व बाजूंनी आश्चर्यचकित केले. त्यामुळे मला वाटते की हे रिकॉम्बिनंट व्हेरियंट व्हायरस पुढे कसे विकसित होणार आहेत याबद्दल माहिती देऊ शकतात. चिंतेचा पुढील व्हेरिएंट किती लवकर बाहेर येईल हे देखील यावरून सांगता येईल, असे ते म्हणाले.
हॉस्पिटलनं 2 दिवसांसाठी आकारले 52 लाख, रुग्णानं एक्स-रेसाठी केला भलताच झुगाड
विषाणूशास्त्रज्ञ (वायरोलॉजिस्ट० सिमोन-लॉरियर म्हणाले, ही काही नवीन चिंता नाही. व्हायरसचा पृष्ठभाग बराचसा ओमायक्रॉनसारखा असतो, त्यामुळे शरीर जसे ओमायक्रॉनला ओळखते, तसेच ते ओळखेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus