Home /News /coronavirus-latest-news /

वटवाघळांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; NeoCov माणसांना किती घातक? WHO नं सांगितलं...

वटवाघळांमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट; NeoCov माणसांना किती घातक? WHO नं सांगितलं...

NeoCov, Wuhan, WHO: जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, चिनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन संशोधनात नवीन विषाणूचा उल्लेख केला आहे. त्याच्या अजून तपासण्या करणं अद्याप बाकी आहे. हा नवीन विषाणू मानवावर किती परिणाम करू शकतो, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) विळख्यातून अजूनही जगाची सुटका होऊ शकलेली नाही. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Covid delta Variant) आणि ओमिक्रॉन व्हेरियंटची (Omicron Variant) हजारो प्रकरणं दररोज नोंदवली जात आहेत. कोविड महामारीच्या संकटाच्या काळात आता जगात नवीन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. खरं तर, चीनच्या वुहान लॅबमध्ये (China Wuhan Lab) वटवाघळांमध्ये एक नवीन विषाणू सापडला आहे, ज्याला NeoCov म्हणतात. वुहान लॅबच्या शास्त्रज्ञांनी या विषाणूबाबत इशारा दिला आहे की, हा कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकतो. NeoCov विषाणू दक्षिण आफ्रिकेत प्रथमच दिसून आला आहे. आता याबाबत जागतिक आरोग्य संघटनेकडूनही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओने (WHO) म्हटले आहे की, NeoCov कोरोनासारखा मानवांनाही धोका ठरू शकतो. याबाबत अजून अभ्यासाची गरज आहे. WHO च्या शास्त्रज्ञांनीच दिला इशारा, लवकरच येणार Corona चा नवा व्हेरिएंट; Omicron पेक्षाही असणार धोकादायक जागतिक आरोग्य संघटनेनं (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन - World Health Organization) सांगितलं की, वुहानच्या शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या नवीन विषाणूच्या उत्पत्तीबद्दल त्यांना माहिती आहे आणि WHO याबाबत जागतिक प्राणी आरोग्य संघटना, अन्न आणि कृषी संघटनांच्या संपर्कात आहे. डब्ल्यूएचओनं म्हटलंय की, मानवांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक संसर्गजन्य रोग प्राणी आणि वन्य प्राण्यांद्वारे होणाऱ्या संसर्गामुळं होतात. या प्राण्यांमध्ये वटवाघळांचाही समावेश आहे. हे वाचा - NeoCov: कोरोनानंतर आणखी एका धोकादायक विषाणूची दहशत, तीन पैकी एकाचा होऊ शकतो मृत्यू! जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, चिनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या नवीन संशोधनात नवीन विषाणूचा उल्लेख केला आहे. त्याच्या अजून तपासण्या करणं अद्याप बाकी आहे. हा नवीन विषाणू मानवावर किती परिणाम करू शकतो, हे अद्याप उघड झालेलं नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, NeoCov च्या प्रसाराचा दर खूप वेगवान असू शकतो आणि या विषाणूनं संक्रमित झालेल्या 3 पैकी 1 व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Virus

    पुढील बातम्या