Home /News /coronavirus-latest-news /

कडुनिंब ठरेल कोरोनावर उपाय! फुफ्फुसांमधील संसर्ग रोखण्यास होईल मदत, नव्या संशोधनात दावा

कडुनिंब ठरेल कोरोनावर उपाय! फुफ्फुसांमधील संसर्ग रोखण्यास होईल मदत, नव्या संशोधनात दावा

अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये (Ayurvedic Medicine) कडुनिंबाचा वापर केला जातो. नव्या संशोधनानुसार कोरोनामुळे फुफ्फुसाला होणारा संसर्ग (Lungs Infection) कडुनिंबाच्या मदतीने रोखला जाऊ शकतो, असं स्पष्ट झालं आहे

कोलकाता, 03 मार्च: गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील अनेक देश कोरोनाचा (Coronavirus Latest Update) सामना करत आहेत. यादरम्यान कोरोनाचे अनेक नवे व्हेरियंट (Variant) आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण (Vaccination) यांचा प्राधान्याने वापर केला जात आहे. दुसरीकडे कोरोनाबाबत संशोधनदेखील सुरु आहे. भारतातही वेगळी स्थिती नाही. या सगळ्यात एका नव्या संशोधनातून काहीसा दिलासा देणारी बाब स्पष्ट झाली आहे. भारतात कडुनिंब (Neem) या वनस्पतीला आरोग्याच्या अनुंषगाने विशेष महत्त्व आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये (Ayurvedic Medicine) कडुनिंबाचा वापर केला जातो. नव्या संशोधनानुसार कोरोनामुळे फुफ्फुसाला होणारा संसर्ग (Lungs Infection) कडुनिंबाच्या मदतीने रोखला जाऊ शकतो, असं स्पष्ट झालं आहे. दैनिक भास्करने याविषयी वृत्त दिलं आहे. कडुनिंब हे भारतातील झाड असून त्यापासून प्राचीन आयुर्वेदिक औषधं तयार केली गेली आहेत. अनेक आजार बरे करण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो. कडुनिंबाची साल (Neem bark) ही कोरोनावर गुणकारी असल्याचं नुकतंच एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. याला युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो एनशुट्ज मेडिकल कॅम्पस आणि कोलकता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्चने दुजोरा दिला आहे. 'सध्या कडुनिंबाच्या सालातल्या रसातील कोणता घटक कोरोनाविरुद्ध काम करतो, हे शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्यानंतर कडुनिंबापासून अ‍ॅंटिव्हायरल औषध (Antiviral Medicine) तयार केलं जाईल तसंच त्याचा डोसही निश्चित केला जाईल,' असं या संशोधनातल्या संशोधिका मारिया नेगल यांनी सांगितलं. हे वाचा-हुश्श! 701 दिवसांनी मिळाली Good News; कोरोनाच्या लढाईत महाराष्ट्राला मोठं यश व्हायरॉलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. कडुनिंबाच्या सालात असे अ‍ॅंटिव्हायरल गुणधर्म असतात की जे कोरोना विषाणूचं मूळ स्वरुप आणि नवी व्हेरियंटला लक्ष्य करू शकतात. मलेरिया, पोटातले व्रण किंवा अल्सर तसेच त्वचा विकारांवर उपचारांसाठी कडुनिंबाची साल वापरली जाते. याबाबत संशोधिका मारिया नेगल यांनी सांगितलं की, 'कोरोनावरील उपचारांसाठी कडुनिंबावर आधारित औषधाची निर्मिती करणं हा या संशोधनाचा उद्देश आहे. यामुळे प्रत्येकवेळी कोरोनाचा नवा व्हेरियंट आल्यावर शास्त्रज्ञांना नवीन उपचार पद्धती विकासित करण्याची गरज भासणार नाही, अशी आम्हाला आशा आहे.' कडुनिंबाच्या सालीचा कोरोनावर काय परिणाम होतो, यावर शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. भारतात हे संशोधन जनावरांवर करण्यात आलं. कडुनिंबाच्या सालाचा रस कोरोना विषाणूतील स्पाइक प्रोटिनला (Spike Protein) चिटकण्यास सक्षम असल्याचं कम्प्युटर मॉडेलिंगद्वारे आढळून आलं. यामुळे कोरोना विषाणू मानवी शरीरातल्या मूळ पेशींना संक्रमित करू शकणार नाही. कोलोरॅडो विद्यापीठातल्या संशोधकांनी कोरोना संक्रमित मानवी फुफ्फुसांवर कडुनिंबाच्या सालाच्या रसाचा परिणाम नोंदवला. कडुनिंब विषाणूच्या वाढीस प्रतिबंध करतं आणि संसर्गदेखील कमी करतं, असं त्यांना आढळून आलं. हे वाचा-वनस्पतीपासून तयार केलं गेलं आहे हे Vaccine! कोरोनाच्या सर्व व्हेरियंटवर प्रभावी मारिया नेगल यांनी सांगितलं की, 'ज्याप्रमाणे घसा खवखवल्यावर आपण पेनिसिलीनची गोळी घेतो, त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग झाल्यावर कडुनिंबापासून तयार केलेलं हे औषध घेतलं जावं. यामुळे गंभीर संसर्ग आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच कोरोना हा एक सामान्य आजार ठरेल,' असेही नेगल म्हणाल्या.
First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus

पुढील बातम्या