Home /News /coronavirus-latest-news /

Third Wave of Coronavirus : आता तयार राहा! कोरोनाच्या नव्या संकटाबाबत मोदी सरकारने केलं Alert

Third Wave of Coronavirus : आता तयार राहा! कोरोनाच्या नव्या संकटाबाबत मोदी सरकारने केलं Alert

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी देश लढत असतानाच केंद्राने आणखी एका संकटाचा इशारा दिला आहे.

  नवी दिल्ली, 05 मे : एकिकडे संपूर्ण देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus second wave) सामना करतो आहे. अशात आता मोदी सरकारने कोरोनाच्या आणखी एका संकटाबाबत सावध केलं आहे आणि हे संकट म्हणजे कोरोनाची तिसरी लाट (Coronavirus third wave). कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे आणि त्यासाठी आपण तयार राहायला हवं असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. त्यावेळी कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं सांगितलं. ही लाट कधी येईल माहिती नाही पण त्यासाठी आपण तयार राहायला हवं, असा सल्ला देण्यात आला आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार (Principal Scientific Advisor to PM) के. विजय राघवन यंनी सांगितलं. कोरोनाची तिसरी लाटही येऊ शकते. आता ज्यापद्धतीने व्हायरसचा संसर्ग होतो आहे, ते पाहता कोरोनाची तिसरी लाट नक्कीच येईल. त्यासाठी आपल्याला सर्वांना तयारीत राहायला हवं. हे वाचा - 'मुंबई पालिकेनं करून दाखवलं, जरा त्यांच्याकडून शिका!' SC नं केंद्राला फटकारलं एप्रिलमध्ये न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत के. विजय राघवन यांनी सांगितलं होतं की, प्रत्यक्षात इतक्या मोठ्या संख्येने प्रकरण समोर येणं ही गंभीर चिंताजनक बाब आहे. पण पीक आणि फॉलवर लक्ष दिलं तर याला जवळपास बारा आठवडे लागू शकतात.  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं पिक म्हणजे सर्वोच्च बिंदू या महिन्याच्या अखेरपर्यंत येईल. संपूर्ण प्रकरणं कमी होण्यात थोडा जास्त वेळ लागेल. पण या महिन्याच्या शेवटी किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला प्रकरणं कमी होतील.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus

  पुढील बातम्या