मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना प्रवेश बंदी नाही; 'या' गटातील असाल तरच मिळेल सूट

अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना प्रवेश बंदी नाही; 'या' गटातील असाल तरच मिळेल सूट

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडून (State Department) हे जाहीर करण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडून (State Department) हे जाहीर करण्यात आलं आहे.

अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडून (State Department) हे जाहीर करण्यात आलं आहे.

वॉशिंग्टन, 3 मे : भारतातल्या वाढत्या कोरोना संसर्गाच्या (Corona) पार्श्वभूमीवर भारतातून अमेरिकेत (USA) जाणाऱ्या प्रवाशांवर बायडेन प्रशासनाने घातलेल्या बंदीतून विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्ती, पत्रकार आणि मदत कार्यातल्या व्यक्ती आदींना सवलत देण्यात आली आहे. अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडून (State Department) हे जाहीर करण्यात आलं आहे.

भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे, तसंच विषाणूचे वेगवेगळे व्हॅरिएंट्स भारतात आहेत. या पार्श्वभूमीवर, भारतातून अमेरिकेत येण्यास चार मे पासून बंदी घालण्यात येणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी अलीकडेच जाहीर केलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेचे गृहमंत्री टोनी ब्लिंकन (Tony Blinken)यांनी या निर्बंधातून विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्ती, पत्रकार आणि अन्य काही व्यक्तींना सवलत दिली जाणार असल्याचं जाहीर केलं.  यापूर्वी ब्राझील, चीन, इराण आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधून येणाऱ्या व्यक्तींना ज्या आधारे अमेरिकेत प्रवेश करण्याची सवलत (National Interest Exception)देण्यात आली होती, त्याच आधारे भारताबाबतचा नवा नियम तयार करण्यात आला असल्याचं अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने जाहीर केलं. कठीण परिस्थितीतही अमेरिकेत प्रवेश करण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध असण्याकरिता ब्लिंकन यांनीहा निर्णय घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

आगामी शैक्षणिक वर्षात ज्यांचा शिक्षणक्रम सुरू होणार आहे असे विद्यार्थी, शैक्षणिक क्षेत्रातल्या व्यक्ती, पत्रकार यांना यातून सवलत मिळेल. तसंच, भारत, ब्राझील, चीन, इराण आणि दक्षिण आफ्रिका या कोरोनाबाधित देशांमध्ये अत्यंत महत्त्वाच्या सेवा देणाऱ्या व्यक्तींनाही या सवलतीअंतर्गत अमेरिकेत प्रवेश करता येऊ शकतो. महामारीमुळे सध्या तरी अमेरिकेच्या सगळ्या देशांतल्या दूतावासांकडून व्हिसावर प्रक्रिया करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो आहे. त्यामुळे व्हिसाच्या संख्येत घट झाली आहे, असंही गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

हे ही वाचा-या देशाच्या PM निवासात वावरतंय भूत? घराचा आहे रक्तरंजित इतिहास

अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्यांनी व्हिसा मिळवण्यासाठी त्यांच्या जवळची एंबसी किंवा काँसुलेट यांच्या वेबसाइटला भेट द्यावी, जेणेकरून याबद्दलची ताजी माहिती मिळू शकेल, असं अमेरिकेच्या गृहमंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. जागतिक परिस्थिती हळूहळू सुधारत चालली आहे. त्या अनुषंगाने व्हिसा प्रक्रियेला (VISA Processes) वेग आणण्याचे वेगवेगळे मार्ग चोखाळले जात आहेत. कर्मचारी आणि प्रवासी यादोन्ही घटकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन,आरोग्य विषयक तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही प्रक्रिया वेगवान करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात आलं.

एक ऑगस्ट किंवा त्यानंतर ज्यांचे शिक्षणक्रम नव्याने सुरू होणार आहेत किंवा आधीच्या शिक्षणक्रमाचं पुढचं वर्ष सुरू होणार आहे, अशा भारतातून अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे अमेरिकेचा वैध F-1 किंवा M-1 व्हिसा असेल, तर त्यांना अमेरिकेत येण्याच्या परवानगीसाठी एम्बसीत वेगळा संपर्क साधण्याची गरजनाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यांचा शिक्षणक्रम सुरू होण्याच्या जास्तीत जास्त 30 दिवस आधी ते अमेरिकेत येऊ शकतात, असं सांगण्यात आलं आहे.  F-1 किंवा M-1 व्हिसाकरिता नव्याने अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी जवळची एम्बसी (Embassy) किंवा कॉन्सुलेटमध्ये (Consulate)उपलब्ध सेवांची स्थिती तपासावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

F-1 किंवा M-1व्हिसासाठी पात्र असलेल्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास कोणतीही अडचण येणार नाही. तसंच, सार्वजनिक आरोग्य, राष्ट्रीय सुरक्षा, मानवता आदी कारणांसाठी देशाबाहेर गेलेल्यांनाही अमेरिकेत प्रवेश करण्यास कोणतीही आडकाठी नाही. तसंच, अन्य ज्या कोणाला आपला अमेरिकेतला प्रवास हा त्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, असं वाटत असेल, त्यांनीही जवळची एम्बसी किंवा कॉन्सुलेटच्या वेबसाइटवरजाऊन त्यांच्याशी संपर्क साधावा.

First published:

Tags: Corona updates