कोरोनाची लक्षणं आहेत पण रिपोर्ट निगेटिव्ह! मुंबईतील 'त्या' रुग्णानं वाढवली चिंता

कोरोनाची लक्षणं आहेत पण रिपोर्ट निगेटिव्ह! मुंबईतील 'त्या' रुग्णानं वाढवली चिंता

एका रुग्णांमध्ये कोरोनाची सर्व लक्षणं दिसून येत आहेत, मात्र या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 24 ऑक्टोबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. सलग काही दिवसांपासून संख्या घटत असून त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र धोका संपलेला नाही इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. शुक्रवारी राज्यात 13 हजार 247 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 14 लाख 45 हजार 103 एवढी झाली. मात्र यात नवी मुंबईत एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका रुग्णांमध्ये कोरोनाची सर्व लक्षणं दिसून येत आहेत, मात्र या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

शुक्रवारी नवी मुंबईत एक वृद्ध व्यक्ती श्वसनाचा त्रास होत असल्यानं रुग्णालयात पोहचली. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. मात्र हळुहळु त्यांना ताप, खोकला याचाही त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केलं, त्यावेळी शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणा कोरोनाची लढत असल्याचे दिसून आलं.

वाचा-जून 2021 पर्यंत कोरोनावर स्वदेशी लस उपलब्ध होणार, भारत बायोटेक कंपनीचा दावा

डॉक्टरांनी दोन वेळा चाचणी केल्यानंतरही या रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. दरम्यान, या रुग्णांची चौकशी केल्यानंतर ही व्यक्ती फेब्रुवारी-मार्चमध्ये धार्मिक स्थळांना भेटी देऊन आल्याचे समोर आले. त्यावरून डॉक्टरांनी या व्यक्तीला कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं उशीरा दिसून येतात. मात्र या केसमध्ये कोरोना होऊन गेल्यानंतर लक्षणं दिसू लागली आहे. त्यामुळे डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे.

वाचा-नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली, 7 हजार नवे रुग्ण

मुंबईत काय आहे स्थिती?

मुंबईत शुक्रवारी एकाच दिवसात आढळून आले 1470 रुग्ण. कोरोणाच्या एकूण रुग्णांची संख्या 248804 वर पोहचली आहे. तर कोरोणामुळे 48 लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या मृतांची एकूण 9966 झाली आहे. दिवसभरात 1696 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 218254 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: October 24, 2020, 10:53 AM IST

ताज्या बातम्या