'अफवांवर विश्वास ठेवू नका..', कोरोना लशीबाबत पंतप्रधानांचं जनतेला आवाहन

'अफवांवर विश्वास ठेवू नका..', कोरोना लशीबाबत पंतप्रधानांचं जनतेला आवाहन

कोरोना लशीच्या वापरानंतर काही साइड इफेक्ट किंवा आजार निर्माण होऊ शकतात अशा चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 16 जानेवारी: भारतासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण देशामध्ये आज तीन लाखहून जास्त आरोग्य कर्मचाख्यांना कोव्हिड-19 ची पहिली लस देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे याबाबत माहिती दिली. संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी लसीकरणाचे अभियान सुरू होणार आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संशोधनाशी संबंधित लोकांचे कौतुक केले. कमी वेळात मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवण्यात आल्याने त्यांनी हे गौरवौद्गार काढले आहेत. इतक्या दिवसांपासून ज्याची सर्वजण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो ते व्हॅक्सिन आज अखेरीस आलं असल्याचं पंतप्रधान म्हणाले. काही लसीकरण अभियानाबाबत त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी पंतप्रधान असं म्हणाले की, 'आपल्या शास्त्रज्ञांना आणि विशेषज्ज्ञांना दोन्ही लशींबाबत खात्री पटल्यानंतरच, त्यांनी या लशींच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे देशवासियांनी कोणताही प्रोपेगँडा, अफवा आणि खोट्या प्रचारापासून सावध राहिले पाहिजे.'

(हे वाचा- कोरोना लशीचे दोन डोस घ्यावेच लागणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ )

ते पुढे म्हणाले की,  'भारतातील व्हॅक्सिन शास्ज्ञज्ञ, आपली मेडिकल सिस्टम, भारताची संपूर्ण प्रक्रियेबाबत संपूर्ण जगात विश्वासार्हता आहे. आपण हा विश्वास आपल्या ट्रॅक रेकॉर्डमुळे मिळवला आहे.'

'मी सगळ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की कोरोना लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल.  दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर आपल्या शरीरात कोविड 19  विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे सुरू होईल', असं मोदी यांनी सांगितले.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. हे डोस सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात पोहोचवण्यात आले आहेत. सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस 200 मिळणार आहे तर बाजारात ही लस प्रति डोस 1000 रुपयांना उपबल्ध होईल, अशी माहिती सीरमचे सीईओ अदार पुनावाला यांनी दिली आहे अर्थात बाजारात लस विक्री करण्याची परवानगी मिळाल्यानंंतरच अशाप्रकारे लस उपलब्ध होईल.

मुंबईतील कूपर रुग्णालयात आरतीचे ताट आणि मिठाई घेऊन कोरोना लस देणाऱ्यांची प्रतीक्षा स्टाफ पाहत होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. पुण्यामध्ये देखील रांगोळी काढून आनंद व्यक्त करण्यात आला होता.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 16, 2021, 11:31 AM IST
Tags:

ताज्या बातम्या