Home /News /coronavirus-latest-news /

कोरोना लस घेतलेल्या तरुणांमध्ये जाणवली ही गंभीर समस्या, CDC नं दिला इशारा

कोरोना लस घेतलेल्या तरुणांमध्ये जाणवली ही गंभीर समस्या, CDC नं दिला इशारा

ऑक्सफर्ड युनिवर्सीटीच्या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्यास त्याचा परिणाम दितो, डोके दुखी, सर्दी, थकवा अशी काही लक्षणं दिसायला लगातात. स्टडीनुसार एखाद्याला पहिला डोस फाइजर व्हॅक्सिन (Pfizer Vaccine) आणि नंतर दूसरा डोस एस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) व्हॅक्सिनचा दिला तर, त्यांना त्रास होतो.

ऑक्सफर्ड युनिवर्सीटीच्या अभ्यासानुसार एखाद्या व्यक्तीने दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी घेतल्यास त्याचा परिणाम दितो, डोके दुखी, सर्दी, थकवा अशी काही लक्षणं दिसायला लगातात. स्टडीनुसार एखाद्याला पहिला डोस फाइजर व्हॅक्सिन (Pfizer Vaccine) आणि नंतर दूसरा डोस एस्ट्रॉजेनेका (AstraZeneca) व्हॅक्सिनचा दिला तर, त्यांना त्रास होतो.

नुकतंच कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेल्या तरुणांमध्ये काही समस्या जाणवत असल्यानं चिंतेत पुन्हा भर पडली आहे. तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लसीकरणानंतर हृदयावर सूज येत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

    वॉशिंग्टन 23 मे : नुकतंच कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेल्या तरुणांमध्ये काही समस्या जाणवत असल्यानं चिंतेत पुन्हा भर पडली आहे. तरुणांमध्ये आणि लहान मुलांमध्ये लसीकरणानंतर हृदयावर सूज येत असल्याचं पाहायला मिळालं आहे. याबाबत यूएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (CDC) अभ्यास करत आहे. या मुद्द्यावर पुढेही अभ्यास करणार असल्याचं सीडीसीनं म्हटलं आहे. 17 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात सीडीसीनं म्हटलं आहे, की अनेक तरुणांमध्ये लस घेतल्यानंतर मायोकार्डिटिसची (Myocarditis) समस्या जाणवली आहे. ही समस्या स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक जाणवत आहे. काय आहे मायोकार्डिटिस (Myocarditis) - मायोकार्डिटिसचा अर्थ आहे, हृदयाच्या मांसपेशींमध्ये सूज येणं. बहुदा ही समस्या उपचारांशिवायच बरी होते. सीडीसीनं म्हटलं, की या समस्येसाठी अनेक प्रकारचे व्हायरस कारणीभूत असू शकतात. या समस्येची जास्त प्रकरणं आढळली नसली तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी याबाबत सतर्क राहाणं गरजेचं आहे. मॉडर्ना-फाइजरची लस घेणाऱ्यांमध्ये आढळली ही समस्या - ही समस्या किती लोकांना जाणवली आहे, याबाबतचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. याबाबत सध्या तपास सुरू आहे. सीडीसीच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणं ही mRNA लस (मॉडर्ना आणि फाइजर) घेतल्यानंतर चार दिवसांनी समोर आली आहेत. याआधी इस्रायलच्या (Israel) आरोग्य मंत्रालयानं म्हटलं होतं, की फाइजर लस घेणाऱ्यांमध्ये हृदयावर सूज येत असल्याची समस्या अधिक आहे. इस्रायलमध्ये ही समस्या 30 वर्ष वयोगटातील लोकांमध्ये अधिक पाहायला मिळाली. फाइजरनं दिलं उत्तर - फाइजरनं म्हटलं, की सामान्य लोकांमध्ये या समस्येची अधिक प्रकरणं पाहायला मिळालेली नाहीत. तसंच या समस्येचा आणि लसीचा काही संबंध असल्याचंही समोर आलेलं नाही. अमेरिकी रेग्युलेटर्सनं मे महिन्यातच फाइजर आणि बायोएनटेकची लस 12-15 वयोगटातील मुलांसाठीही वापरण्याची परवानगी दिली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या