मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सावधान! मुंबईत 2 नवे कोरोना व्हेरिएंट सापडल्याने खळबळ; Omicron पेक्षा भयंकर XE Variant चाही समावेश

सावधान! मुंबईत 2 नवे कोरोना व्हेरिएंट सापडल्याने खळबळ; Omicron पेक्षा भयंकर XE Variant चाही समावेश

Corona XE Variant in India's first case in Mumbai : भारतात XE कोरोना व्हेरिएंट घुसला असून याचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे.

Corona XE Variant in India's first case in Mumbai : भारतात XE कोरोना व्हेरिएंट घुसला असून याचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे.

Corona XE Variant in India's first case in Mumbai : भारतात XE कोरोना व्हेरिएंट घुसला असून याचा पहिला रुग्ण मुंबईत सापडला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 06 एप्रिल :  भारतात आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट घुसला आहे. काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ज्या व्हायरसबाबत सावध केलं होतं, त्या एक्सई व्हेरिएंटने (XE variant in India) भारतात एंट्री घेतली आहे. देशातील पहिला रुग्ण मुंबईतच आढळला आहे (XE variant in Mumbai). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनपेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य असल्याचं डब्ब्लूएचओने सांगितलं आहे (New corona variant in Mumbai).

मुंबईत जीनोम सिक्वेसिंगसाठी काही नमुने पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आला आहे. यात शहरात कोरोनाच्या दोन नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याचं निदान झालं आहे. यामध्ये XE आणि Kappa variant च्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने (BMC) दिली आहे.

XE हा ओमिक्रॉनचे (Omicron) सबव्हेरिएंट  BA.1 आणि BA.2 या प्रकारातून बनलेला आहे. म्हणजे तो recombinant आहे. 19 जानेवारी रोजी सर्वात आधी यूकेमध्ये हा व्हेरिएंट आढळला. WHO च्या प्राथमिक अंदाजानुसार, XE हा ओमिक्रॉनच्या BA.2  पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. मात्र, या दाव्याविषयी आणखी संशोधन होण्याची आवश्यकता आहे, असंही WHO ने म्हटले आहे.

हे वाचा -Alert! कोरोनापेक्षाही महाभयंकर Zombie Virus पसरतोय; खरंच प्रत्यक्षात माणसं झॉम्बी बनणार?

त्यामुळे  कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात येऊन जनजीवन आता पूर्वपदावर आलं आहे. असं असलं तरी जगातील अनेक भागांमध्ये कोविड संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता कोरोना नियमांचं पालन करावं. मास्कचा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करावा, सुरक्षित अंतर राखावं, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन करावं, असं आवाहन बीएमसीने केलं आहे.

हे वाचा -भारतातील पहिला XE Variant कोरोना रुग्ण मुंबईत; किती खतरनाक आहे हा व्हेरिएंट पाहा

सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण करणंही गरजेचं आहे. लसीकरण पूर्ण करून घेणाऱ्यांना आणि कोरोना प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना विषाणू बाधेपासून सर्वाधिक संरक्षण मिळतं. तसंच बाधा झाली तरी त्याची तीव्रता पूर्णपणे रोखता येते. लस न घेतलेल्यांना कोविड बाधेपासून तीव्र धोका संभवतो, हा वैद्यकीय इशारा लक्षात घेता सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घेणे आवश्यक आहे, असंही बीएमसीने सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai