मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Mumbai Corona Vaccination: मुंबईत कोरोना लसीकरणाचे नियम बदलले, दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण

Mumbai Corona Vaccination: मुंबईत कोरोना लसीकरणाचे नियम बदलले, दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण

मुंबईत कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination)  नियम (Rules) बदलण्यात आले आहेत. आता मुंबईत (Mumbai) दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे.

मुंबईत कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) नियम (Rules) बदलण्यात आले आहेत. आता मुंबईत (Mumbai) दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे.

मुंबईत कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) नियम (Rules) बदलण्यात आले आहेत. आता मुंबईत (Mumbai) दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 22 जानेवारी: मुंबईत कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) नियम (Rules) बदलण्यात आले आहेत. आता मुंबईत (Mumbai) दोन शिफ्टमध्ये लसीकरण केले जाणार आहे. यापुढे मुंबईत 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण दुपारी होईल. तर 18 वर्षांवरील व्यक्तींचं सकाळी लसीकरण (Mumbai Corona Vaccination) केलं जाईल. लसीकरणाचे हे नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यापासून लागू होणार आहे.

हे नवे वेळापत्रक मुंबई महापालिकेनं निश्चित केलं आहे. 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या लसीकरणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत फारसा उत्साह दिसून येत नाही. त्यामुळे याला वेग देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं (BMC) लसीकरण मोहीम दोन शिफ्टमध्ये करण्याचे नियोजन केलं आहे.

Jammu-Kashmir Encounter: शोपियानमध्ये चकमक सुरु, दोन दहशतवाद्यांना घेरलं

15 ते 18 वर्षांच्या लहान मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू झालं आहे. मुंबईत या वयाच्या लसीचा डोस घेणाऱ्या मुलांची संख्या 9 लाख 22 हजार 566 आहे. यापैकी 18 जानेवारीपर्यंत एकूण 1 लाख 77 हजार 614 लहान मुलांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या 20 टक्के मुलांनी आतापर्यंत लस घेतली आहे.

उर्वरित मुलांच्या लसीकरणाला गती देण्यासाठी BMC कडून प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई पालिका आता प्रत्येक शाळेच्या आवारात लसीकरण शिबिरे आयोजित करण्याची तयारी करत आहे. या लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी खासगी संस्थांनीही पुढे येण्याचं आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत बीएमसीच्या जम्बो कोरोना केंद्रांसह सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांची संख्या 351 आहे. जम्बो कोरोना केंद्रांवरही 18 वर्षांवरील व्यक्तींसह 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू आहे. यापुढे पालिकेच्या जम्बो कोरोना केंद्र आणि इतर सर्व लसीकरण केंद्रांमध्ये दोन्ही वयोगटातील लोकांसाठी दोन वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

जराही करु नका दुर्लक्ष... Omicron चं एक नवीन लक्षण आलं समोर 

पुढील आठवड्यापासून ते सुरू होईल. याअंतर्गत 18 वर्षांवरील व्यक्तींना सकाळी लसीकरण करता येणार असून दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजेच दुपारी 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्यात येणार आहे.

मुंबईतील कोरोनाची परिस्थिती

शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे 5 हजार 8 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय 12 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईत गेल्या एका दिवसात 12 हजार 913 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या मुंबईत कोरोनाचे 14 हजार 178 सक्रिय रुग्ण आहेत.

First published:

Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus