Home /News /coronavirus-latest-news /

स्तनपान देणाऱ्या मातांच्या लसीकरणासाठी BMCची नवी सुविधा

स्तनपान देणाऱ्या मातांच्या लसीकरणासाठी BMCची नवी सुविधा

स्तनपान देणाऱ्या (Lactating Mothers)मातांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिके (Civic Body) नं नवा निर्णय घेतला आहे.

    मुंबई, 26 मे: स्तनपान देणाऱ्या मातांच्या (Lactating Mothers) लसीकरणासाठी मुंबई महापालिके (BMC) नं नवा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेनं अशा महिलांसाठी आजपासून तीन दिवस वॉक इन (walk in) लसीकरण ठेवलं आहे. आज मुंबईत स्तनपान देणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक कोव्हिशील्ड (Covishield) चा पहिला डोस घेऊ शकणार आहेत. तर 45- 59 या वयोगटातील नागरिकांना दुसरा डोस घेता येणार आहे. 45 पुढील वयोगटातील नागरिकांसाठी वॉक इन लसीकरणा (Covid-19 vaccination) ची सुविधा ठेवल्यानंतर मुंबईत आतापर्यंत 18 हजार 218 नागरिकांनी पालिकेच्या केंद्रांवर जाऊन पहिली लस घेतली. या 6 हजार 355 ज्येष्ठ नागरिक आणि 45-59 वयोगटातील 10 हजार 701 नागरिकांचा समावेश आहे. तर 45 ते 59 वयोगटातील 1 हजार 78 नागरिकांनी, 18 ते 44 वयोगटातील 10 हजार 51 नागरिकांनी खासगी केंद्रांवर जाऊन लसीकरण केलं. हेही वाचा- पुणेकरांसाठी पॉझिटिव्ह बातमी, शहरात डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्या वाढली  महानगरपालिकेनं स्तनपान देणाऱ्या मातांसाठी सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस लसीकरण केंद्रात वॉक इन लसीकरण घेण्याची परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 19 मे रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार स्तनपान देणाऱ्या मातांनाही कोविड -19 ची लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. हेही वाचा- अन् राज ठाकरे झाले भावूक, पत्र पाठवून कार्यकर्त्यांना दिला धीर
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: BMC, Corona vaccination, Coronavirus, Mumbai, Mumbai muncipal corporation

    पुढील बातम्या