Home /News /coronavirus-latest-news /

भय इथलं संपत नाही, कोरोनातून बऱ्या होणाऱ्या मुलांना आता 'हा' आजार होतोय; जाणून घ्या लक्षणे

भय इथलं संपत नाही, कोरोनातून बऱ्या होणाऱ्या मुलांना आता 'हा' आजार होतोय; जाणून घ्या लक्षणे

कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसमुळं वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्यातच आता लहान मुलांना एमआयएससी (MISC) आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.

    जयपूर, 21 मे : देशात सध्या कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळं (Corona Second Wave) गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही राज्यांमध्ये सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचं प्रमाण अद्यापही चिंताजनक आहे. दुसऱ्या लाटेतून अजून आपण सावरलो नसताना आता तिसऱ्या लाटेमुळं लहान मुलांना अडचणी निर्माण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनासोबतच आता ब्लॅक फंगसमुळं वेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्यातच आता लहान मुलांना एमआयएससी (MISC) आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. कोरोनानंतर लहान मुलांना मल्टी सिस्टम इंफेलमेंट्री सिड्रोम चिल्ड्रनमुळं काळजी करण्याची वेळ आली आहे. राजस्थानमध्ये या आजाराची 100 मुलांना बाधा झाली आहे. त्यामध्ये राजधानी जयपूरमधील सर्वाधिक 25 मुलांचा समावेश आहे. राजस्थानमध्ये लहान मुलं कोरोनामधून बरे झाल्यानंतर या आजाराचा सामना करत आहेत. या आजारामुळम कोरोनातून बरे झाल्यानंतर महिनाभर लहान मुलांच्या अंगावर विविध ठिकाणी सूज येते. लाल रंगाचे चट्टेही दिसून येतात. या आजाराची लक्षणे अमेरिकेत होणाऱ्या कावासाकी आजाराशी मिळतीजुळती आहेत. मात्र, हा कावासाकी आजार नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचाCorona Third Wave : खरंच कोरोनाची तिसरी लाट येणार का? काय आहे तिचा धोका? लक्षणं काय आहेत? लहान मुलांना तीन दिवस जास्त ताप येतो. शरीराचा लालसरपणा किंवा लाल चट्टे, लाल डोळे होणे, ओटीपोटात वेदना, उलट्या  झाल्यानं बीपी वाढण्याती शक्यता, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदय धडधडणे, हृदयाची गती वाढणे, लाल मूत्र इत्याही लक्षणांचा समावेश आहे, असे या आजारावर उपचार करणाऱ्या डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितलं. चांगली गोष्ट अशी आहे की, लक्षणं दिसून आल्यानंतर वेळेवर उपचार सुरू केल्यास रुग्ण पाच ते सहा दिवसांत बरे होऊ शकतात. परंतु, जास्त वेळ घालवल्यास धमन्यांमध्ये सूज येवून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. मूत्रपिंडात सूज आल्यावर मूत्रातून रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो आणि जर मेंदूपर्यंत सूज गेल्यास असामान्य वागण्यासारखी समस्या उद्भवते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या