मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Explainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं मार्गदर्शन

Explainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं मार्गदर्शन

Mucormycosis : कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातही 2 हजारावर रुग्ण या आजाराने ग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे.

Mucormycosis : कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातही 2 हजारावर रुग्ण या आजाराने ग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे.

Mucormycosis : कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे. राज्यातही 2 हजारावर रुग्ण या आजाराने ग्रस्त झाल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली, 14 मे: देशात एकीकडे कोरोनाचा (Corona) कहर सुरू असतानाच आता नव्या बुरशीजन्य आजाराचे संकट आले आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून म्युकरमायक्रोसिस (Mucormycosis) म्हणजेच काळ्या बुरशीचा (Black Fungus) संसर्ग झपाट्याने वाढत असून, रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन (Central Health Minister Dr. Harshvardhan) यांनी Tweet करीत नागरिकांनी या दुर्मिळ संसर्गजन्य आजाराबाबत कशी काळजी घ्यावी,याबाबत मार्गदर्शन केले आहे.

म्युकरमायक्रोसिस हा संसर्गजन्य आजार काळी बुरशी या नावाने देखील ओळखला जातो. कोरोनाबाधित रुग्णांना याचा संसर्ग झपाट्याने होत असल्याचे दिसून येत आहे. जागरुकता आणि लवकर निदान हे या बुरशीजन्य संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत करू शकतात. तो कसा ओळखायचा आणि त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी चार स्लाईडसव्दारे व्टिटरवरुन (Twitter)मार्गदर्शन केले आहे.

यात पहिल्या स्लाईडमध्ये म्युकरमायक्रोसिसची व्याख्या देण्यात आली आहे. म्युकरमायक्रोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. ज्या रुग्णांना काही आजार असतात,तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ते पर्यावरणीय रोगजनकांशी लढू शकत नाहीत,त्यांना म्युकरमायक्रोसिसच्या संसर्गाचा धोका अधिक असतो.

Explainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?

दुसऱ्या स्लाईडमध्ये रुग्ण या संक्रमणाला कसा बळी पडतो,या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. कोमॉर्बिडीटीज (Comorbidities),व्हॅरिकोनाझल थेरपी,अनियंत्रित मधुमेह,इन्शुलिनच्या कमतरतेमुळे रक्त आणि लघवीमध्ये साखर आढळणे,स्टिरॉईड सारख्या इम्युनोसप्रेशन औषधांचे सेवन आणि दिर्घकाळ आयसीयुमध्ये राहणे यामुळे या बुरशीजन्य रोगाचा संसर्ग होऊ शकतो.

पुढील दोन स्लाईडसमध्ये म्युकरमायक्रोसिसची लक्षणे आणि रुग्णांनी काय करावे,काय करु नये,याचे विश्लेषण देण्यात आले आहे.

म्युकरमायक्रोसिस हा विषय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये विशेष चर्चेत आला कारण कोरोनावर उपचार घेत असलेले आणि कोरोनामुक्त झालेले रुग्ण यांना या बुरशीजन्य आजाराचा संसर्ग होताना दिसत आहे.

राज्यात सध्या या आजाराचे 2000 हून अधिक रुग्ण असल्याचे महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सांगितले. बृहन्मुंबई महापालिकेने सांगितले की कोविडग्रस्त 111 रुग्णांवर मुंबईतील रुग्णालयात म्युकर मायक्रोसिस झाल्याने उपचार सुरू आहेत.

ऑक्सिजनची फार लागत नाही गरज; कोरोना रुग्णांवर नेमकं कसं काम करतं 2 DG औषध?

कर्नाटकमध्ये (Karnataka) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर तेथील सरकारने केंद्राकडे एम्फोटेरेसिन बी (Amphotericin b) या औषधाच्या 25,000 डोसेज चा पुरवठा करावा,अशी विनंती केली आहे. हे औषध हा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याचप्रमाणे उडीशा,दिल्ली,राजस्थान,गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील म्युकरमायक्रोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.

मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) काळ्या बुरशीचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. याकरिता भोपाळ आणि जबलपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 10 बेडसची सुविधा तयार करण्यात आली असून म्युकरमायक्रोसिस उपचार युनिट सुरु करण्यात आल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली.

First published:

Tags: Coronavirus, Health