Home /News /coronavirus-latest-news /

Coronavirus : mRNA लशीमुळे महिलांच्या मासिक पाळीवर होतोय परिणाम?

Coronavirus : mRNA लशीमुळे महिलांच्या मासिक पाळीवर होतोय परिणाम?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांना मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव झाल्याच्या किंवा मासिक पाळी बंदच झाल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली 12 फेब्रुवारी : कोरोना लशींच्या (Corona Vaccine) संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. फायझर आणि (Pfizer) मॉडर्ना (Moderna) या कंपन्यांची कोरोनाप्रतिबंधक लस घेतलेल्या महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम झाल्याच्या रिपोर्टची चौकशी केली गेल्याची माहिती युरोपियन मेडिसिन एजन्सीच्या (European Medicines Agency) सुरक्षा समितीनं शुक्रवारी (11 फेब्रुवारी) दिली आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर महिलांना मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव झाल्याच्या किंवा मासिक पाळी बंदच झाल्याच्या तक्रारी आल्या असल्याची माहिती आहे. मेसेंजर आरएनए तंत्रज्ञानावर आधारित (Messenger RNA technology) दोन लशींपैकी एक लस घेतल्यावर मासिक पाळीबद्दलच्या समस्यांच्या तक्रारी आल्यानंतर ही चौकशी करण्यात आली होती. अर्थात महिलांच्या मासिक पाळीबद्दलच्या या तक्रारी आणि कोरोना लस यांचा थेट संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट झालेलं नाही. महिलांचं आरोग्य, वाढता तणाव किंवा थकवा हीदेखील मासिक पाळीच्या वाढत्या समस्यांची कारणं असू शकतात असंही EMA नं म्हटलं आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनं नुकताच एक अभ्यास केला होता. COVID-19 ची लस घेतल्यानंतर काही काळाने मासिक पाळीच्या सायकलमध्ये बदल झाल्याचं या अभ्यासात म्हटलं होतं. Corona pandemic चा अंत जवळ आला? WHO ने दिली दिलासादायक बातमी या अभ्यासांतर्गत मासिक पाळीच्या चक्राची नोंद ठेवणाऱ्या स्मार्टफोन ॲपद्वारे जवळपास चार हजार युझर्सचा डेटा गोळा करण्यात आला होता; पण मासिक पाळी आणि COVID-19 ची लस यांच्यामध्ये थेट संबंध आढळला नसल्याचं EMA नं डिसेंबरमध्ये सांगितलं होतं. मात्र काही महिलांना लस घेतल्यानंतर मासिक पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्राव झाल्याचं नॉर्वेमधल्या एका अभ्यासात म्हटलं होतं. उपलब्ध असलेल्या पुराव्यांवरून Pharmacovigilance Risk Assessment Committee-PRAC नं पूर्ण अभ्यास केला. उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या आकडेवारीचा तपास करण्याचा निर्णय घेतल्याचं PRAC च्या वतीनं सांगण्यात आलं होतं. यामध्ये रुग्ण, डॉक्टर्स आणि संबंधित आरोग्य व्यावसायिक तसंच क्लिनिकल ट्रायल्सच्या (clinical trials) डेटासह प्रसिद्ध झालेले रिपोर्ट्स यांचाही समावेश आहे. COVID-19 च्या लसीकरणाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचाही काही पुरावा नाही असं या एजन्सीनं शुक्रवारी स्पष्ट केलं आहे.

दुसऱ्या लाटेत कोरोना झालेल्यांना या गंभीर आजाराचा धोका, काय करू शकता उपाय

सध्या अत्यंत महत्त्वाच्या या विषयावर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सुरू आहे. मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्राव होत असेल तर कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणं केव्हाही चांगलं.
First published:

Tags: Corona updates, Corona vaccine

पुढील बातम्या