मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'सलून वर्कर'ऐवजी 'सेक्स वर्कर' म्हणून काढला लसीकरणाचा आदेश, अन् झाली फजिती

'सलून वर्कर'ऐवजी 'सेक्स वर्कर' म्हणून काढला लसीकरणाचा आदेश, अन् झाली फजिती

मंत्री समूहाच्या शिफारसींनुसार आज आरोग्य विभागानं जारी केलेल्या आदेशावरून विरोधकांनी राज्यातील सरकारची चांगलीच खिल्ली उडवली. आदेशात एक शब्द चुकीचा लिहिला होता, त्यामुळं सर्वांनी त्यावरून सरकारला लक्ष्य केलं.

    भोपाळ, 31 मे : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरणाचा (Corona Vaccination) कार्यक्रम सुरू आहे. राज्यात निर्देशानुसार स्थापन केलेल्या मंत्र्यांच्या समितीच्या शिफारसीनुसार समाजातील विविध स्तरातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे. याच मंत्री समूहाच्या शिफारसींनुसार आरोग्य विभागानं जारी केलेल्या आदेशावरून विरोधकांनी राज्यातील सरकारची चांगलीच खिल्ली उडवली. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मोहम्मद सुलेमान यांच्या सहीने जारी केलेल्या एका आदेशात सर्वाधिक जोखीम असलेल्या लोकांचे आधी लसीकरण केले जाण्याचा आदेश काढण्यात आला. या आदेशावरून मध्यप्रदेशच्या शिवराजसिंह चौहान (CM Shivraj singh Chouhan) यांच्या सरकारवर टीका करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून सर्व जिल्हाधिकार्‍यांना जारी केलेल्या या आदेशात किराणा दुकान, विक्रेते, घरगुती सिलेंडर पोहोचवणारे, पेट्रोल पंप कर्मचारी, घरकाम करणाऱ्या महिला, व्यापारी, भाजी विक्रेते, दूधवाले, हातगाडीवाले, वाहन चालक मजूर आणि हॉटेलचे कर्मचारी शिक्षक केमिस्ट बँकर्स, सुरक्षारक्षक यांना लसीकरण करण्याची शिफारस करण्यात आली. यासह या यादीत सेक्स वर्कर असेही लिहिण्यात आले होते. यावरून विरोधकांकडून आरोग्य विभाग आणि सरकारची जोरदार खिल्ली उडवण्यात आली. यानंतर जारी आदेशात गफलत झाल्यानं सलून वर्करऐवजी असा शब्द लिहिला गेल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. ही चूक सुधारून नवा आदेश जारी करेपर्यंत यावरून वातावरण तापून गरमागरम चर्चा झाली होती. हे वाचा - Ideal couple होण्याची हीच वेळ! बेरोजगरीच्या काळात जोडीदाराची द्या साथ काँग्रेसने आरोग्य विभागाच्या आदेशावर ओढले ताशेरे मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विट करून प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. भाजप नेत्यांच्या विशेष मागणीवरून सरकारी आदेशात ही शिफारस करण्यात आली नाही ना? असा प्रश्न त्यांनी केला आहे. दरम्यान, या आदेशावरून जोरदार चर्चा आणि आरोप होत असतानाच त्यात बदल करून नवा आदेश जारी करण्यात आला. यात सेक्स वर्करऐवजी सलून वर्कर असा बदल केला होता. त्यासोबतच आधीच्या आदेशात गफलत झाल्यामुळं चुकीचा शब्द लिहिला गेला होता, असं स्पष्टीकरण आरोग्य विभागानं दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Corona vaccination, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या