मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /सलाम! कोरोनाला हरवण्यासाठी नर्सचं मोलाचं कार्य, 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता 61000 जणाचं केलं Vaccination

सलाम! कोरोनाला हरवण्यासाठी नर्सचं मोलाचं कार्य, 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता 61000 जणाचं केलं Vaccination

Representational Image

Representational Image

Coronavirus Vaccination In India: देशभरातले लाखो आरोग्य कर्मचारी (Health Workers) लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अनेकांनी आपल्या वैयक्तिक अचडणी बाजूला ठेवून स्वत:ला कामात झोकून दिलं आहे.

    भोपाळ, 29 सप्टेंबर: गेल्या सुमारे दीड-दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus Pandemic) धुमाकूळ घातला आहे. भारतालादेखील (Coronavirus in India) याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. आतापर्यंत लाखो जणांना कोरोनाची लागण झाली असून, लाखोंनी जीव गमावला देखील गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी विविशी लशी विकसित केल्या आहेत. देशात जानेवारी 2021 पासून लसीकरणाची मोहीम (corona vaccination drive in India) सुरू करण्यात आली. देशभरातले लाखो आरोग्य कर्मचारी (Health Workers) लसीकरणाची मोहीम पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अनेकांनी आपल्या वैयक्तिक अचडणी बाजूला ठेवून स्वत:ला कामात झोकून दिलं आहे.

    भोपाळमध्ये अशी एक महिला आरोग्य कर्मचारी आहे, जिने गेल्या आठ महिन्यांत एकही सुट्टी घेतलेली नाही आणि या कालावधीत तिने लशीचे 61 हजार डोसेस दिले आहेत! गायत्री श्रीवास्तव (Gayatri Srivastava) असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे. आपल्या कामाप्रति असलेलं त्यांचं समर्पण पाहून मध्य प्रदेशचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी गायत्री यांचं कौतुक केलं आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.

    हे वाचा-कोरोना लसीकरणात महाराष्ट्रच अव्वल; देशात सर्वाधिक लसीकरण करूनही यूपी पिछाडीवर

    देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याअगोदर जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी देशातले आरोग्य कर्मचारी दिवसरात्र धावपळ करत आहेत. त्यांनी झोकून देऊन काम केल्यामुळेच आतापर्यंत मोठं उद्दिष्ट गाठता आलं आहे. मध्य प्रदेशातल्या छतरपूर रुग्णालयात कार्यरत असलेल्या एएनएम माया अहिरवार (Maya Ahirwar) यांनी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून एकही रजा न घेता आतापर्यंत लशीचे 64 हजार डोसेस दिले आहेत. माया अहिरवार यांच्यासोबतच आता मध्य प्रदेशातल्याच गायत्री श्रीवास्तव यांचंही नाव जोडलं गेलं आहे. मध्य प्रदेशातल्या या दोन्ही परिचारिकांच्या नावांची चर्चा सध्या सुरू असून, त्यांचं कौतुक होत आहे.

    भोपाळच्या रहिवासी असलेल्या गायत्री सध्या काटजू रुग्णालयात (Katju Hospital in Bhopal) सहायक परिचारिका (ANM) म्हणून सेवा देत आहेत. जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरण सुरू झाल्यापासून त्या या कामात व्यग्र आहेत. विशेष म्हणजे त्यांनी 25 जानेवारीपासून आतापर्यंत एकही सुट्टी घेतलेली नाही. गेल्या आठ महिन्यांच्या काळात त्यांनी तब्बल 61 हजारांहून अधिक डोसेस दिले आहेत. एक लाख नागरिकांना लस देण्याचा आपला संकल्प असल्याचं गायत्री यांनी सांगितलं आहे.

    हे वाचा-या ड्रिंक्समुळे पॉझिटिव्ह येऊ शकतो कोरोना रिपोर्ट; समोर आली धक्कादायक बाब

    गायत्री यांच्यासारख्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळेच मध्य प्रदेश कोरोना लसीकरणाचा (MP Corona Vaccination) नवीन विक्रम दररोज प्रस्थापित करत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य शिक्षण मंत्री विश्वास सारंग (Vishwas Sarang on Vaccination in MP) यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मंत्री सारंग यांनी काटजू रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्यांना गायत्री श्रीवास्तव यांच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ गायत्री यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि त्यांचा सत्कारदेखील केला.

    First published:
    top videos

      Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Madhya pradesh