इंदूर, 30 डिसेंबर: कोरोनाची (coronavirus Second Wave) दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच ओमिक्रॉनचे (omicron latest Update) रुग्ण देशात वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. या आजारापासून वाचण्यासाठी वेगाने लसीकरण (vaccination drive in India) करण्यावर भर दिला जातोय. मात्र, लस घेतल्यानंतर तुम्हाला कोरोना आजार होणारच नाही, असा समज करून तुम्ही जर कोरोना अनुषंगाने असणाऱ्या नियमावलीचं पालन करणं टाळत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण एका महिलेने कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे एक नव्हे, दोन नव्हे तब्बल चार डोस घेतल्यानंतरही तिला कोरोनाने गाठलं आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक दोन वेगवेगळ्या लसींचे एकूण चार डोस घेतल्यानंतरही एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर (Indore woman tested corona positive after taking 4 doses of vaccine) येथे बुधवारी हा प्रकार उघड झालाय. येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका 44 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी केली असता तिला संसर्ग झाल्याचं आढळून आलं. यानंतर महिलेला एअर इंडियाच्या इंदूर-दुबई विमानामध्ये प्रवास करण्यास मनाई करण्यात आली असून तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
हे वाचा-आता कोरोना लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही; हातातच बसवली जाणार मायक्रोचीप
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने जानेवारी ते ऑगस्ट 21 दरम्यान अनुक्रमे सिनोफार्म आणि फायझरच्या अँटी-कोविड लसींचे प्रत्येकी दोन डोस घेतले होते. या महिलेची विमानतळावर कोरोना चाचणी केली असता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महिलेच्या शरीरात कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसत नव्हतं. मात्र चार दिवसांपूर्वीपासून सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्याचं तिनं विमानतळावरील आरोग्य विभागाच्या पथकाला सांगितलं. सध्या या महिलेला मनोरमा राजे टीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
हे वाचा-हृदयातही घुसतोय कोरोना; संशोधनातून समोर आली धक्कादायक बाब
'इंदूर-दुबई या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर कोरोनाच्या अनुषंगाने चाचणी केली जाते. त्यानुसार बुधवारी 89 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 44 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. ही महिला दुबईची रहिवासी असून 12 दिवसांपूर्वी महू शहरात एका लग्नात सहभागी होण्यासाठी भारतात आली होती,' अशी माहितीही डॉ.कौरव यांनी दिली.
लसीचे चार डोस घेतल्यानंतरही संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. अर्थात तिच्यामध्ये कोणतंही लक्षण दिसून येत नसलं तरीही लस घेतल्यानंतर मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अशा नियमांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोना अनुषंगाने असणाऱ्या नियमावलीचं पालन करणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona