मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

UK मध्ये Unlock चं स्वप्न लांबणार? भीती वाढली; कोरोना संसर्ग झालेले निम्म्याहून अधिक लोकांनी घेतली होती लस

UK मध्ये Unlock चं स्वप्न लांबणार? भीती वाढली; कोरोना संसर्ग झालेले निम्म्याहून अधिक लोकांनी घेतली होती लस

 ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (third wave of corona virus) प्रभाव दिसणं सुरू झालं असून नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण (more than 50 percent) हे लस घेतलेले असल्याचं दिसून आलं आहे.

  • Published by:  desk news

लंडन, 14 जुलै : ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (third wave of corona virus) प्रभाव दिसणं सुरू झालं असून नव्यानं आढळलेल्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण (more than 50 percent) हे लस घेतलेले असल्याचं दिसून आलं आहे. यामुळं ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नवं आव्हान निर्माण झालं आहे. सोमवारपासून ब्रिटनमध्ये पूर्ण अनलॉक (Total Unlock) घोषित करण्यात आलं आहे. मात्र आता याची अंमलबजावणी होणार की नाही, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

ब्रिटनमध्ये तिसरी ला

ब्रिटनमधील कोरोनाची रुगणसंख्या गेल्या काही दिवसांत वाढू लागली आहे. कोरोनाची लागण झालेल्या एकूण नागरिकांपैकी 87.2 टक्के असे नागरिक आहेत, ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली आहे. 6 जुलै रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 12 हजार 905 नागरिक असे होते, ज्यांनी कोरोनाची लस घेऊनदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भविष्यात कोरोनाचा उद्रेक अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनलॉकची घोषणा

ब्रिटनमध्ये लसीकरणानं वेग घेतला असून सोमवारपासून कोरोनापूर्व काळाप्रमाणे ब्रिटनमधील व्यवहार सुरू होतील, अशी घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली होती. आपल्या या घोषणेवर ठाम असून ठरल्याप्रमाणे अनलॉकची प्रक्रिया पार पडेल, असंही त्यांनी काही दिवसांपूवी जाहीर केलं होतं. आताही पंतप्रधान जॉन्सन हे निर्णयावर ठाम असले, तरी त्यांनी नागरिकांना सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

हे वाचा -भारत नव्हे, आता हा देश ठरतोय आशियातला कोरोना हॉटस्पॉट

काय म्हणाले बोरिस जॉन्सन?

ब्रिटनमध्ये आतापर्यंत निम्म्याहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं असून कोरोनापूर्व काळात आपण परततो आहोत, अशी घोषणा पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केली होती. यापुढे मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या प्रकारांची आपल्याला गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. अनलॉकचा निर्णय घोषणा केल्याप्रमाणे अंमलात येईल, मात्र नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि तिसरी लाट ओसरेपर्यंत काही मूलभूत नियमांचं पालन करावं, अशी विनंती पंतप्रधान जॉन्सन यांनी केली आहे.

First published:

Tags: Britain, Corona, Corona vaccination