Home /News /coronavirus-latest-news /

COVID-19 in India: रुग्णसंख्येनं पुन्हा ओलांडला 4 लाखाचा टप्पा, मृतांचा आकडा घटला

COVID-19 in India: रुग्णसंख्येनं पुन्हा ओलांडला 4 लाखाचा टप्पा, मृतांचा आकडा घटला

चोवीस तासात देशात 4 लाख 14 हजार 182 नवीन कोरोना रुग्णांची (Coronavirus outbreak in India Latest Update) नोंद झाली आहे. तर, 3,920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई 07 मे : कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सलग दोन दिवस देशात एकाच दिवसात 4 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत तीन वेळा कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या 4 लाखाच्या पार गेली आहे. मागील चोवीस तासात देशात 4 लाख 14 हजार 182 नवीन कोरोना रुग्णांची (Coronavirus outbreak in India Latest Update) नोंद झाली आहे. तर, 3,920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारबद्दल बोलायचं झाल्यास यादिवशी 4 लाख 12 हजार 262 रुग्ण (Corona Cases) आढळले होते. तर, 3,980 रुग्णांचा मृत्यू झाला होता. हेही वाचा - कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की नवीन रुग्णसंख्या समोर आल्यानंतर आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2,14,91, 592 वर पोहोचली आहे. तर, या विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,34,088 हून अधिक झाली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच या महामारीतून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचं दिलासादायक चित्र आहे. मागील चोवीस तासात 3 लाख 28 हजार 141 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. हेही वाचा - लहान मुलांचं लसीकरण केल्यास कोरोनावर मात मिळवणे सहज शक्य महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात गुरुवारी कोरोनाचे नवे 62,194 रुग्ण आढळले आहेत. तर, 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत राज्यात 73,515 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, बाधितांची एकूण संख्या 49,42,736 इतकी झाली आहे. बुधवारच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत 4554 ने वाढ झाली आहे. तर, मृतांची संख्या मात्र घटली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases

    पुढील बातम्या