जनरल वॉर्डपेक्षा ICU मध्ये सर्वाधिक कोरोनाव्हायरस; धक्कादायक संशोधन

An employee prepares emergency medical care for patients with suspected coronavirus infection in the Illinsky hospital in Krasnogorsk, outside Moscow, Russia, Thursday, March 26, 2020. The new coronavirus causes mild or moderate symptoms for most people, but for some, especially older adults and people with existing health problems, it can cause more severe illness or death. (Sergey Vedyashkin, Moscow News Agency photo via AP)

ICU मधील 43.5% नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर जनरल वॉर्डमधील फक्त 7.9 टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत

  • Share this:
    बीजिंग, 26 एप्रिल : कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे काही डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. अशाच एक धक्कादायक बाबत समोर येत आहे, ती म्हणजे रुग्णालयातील जनरल वॉर्डपेक्षा आयसीयू सर्वात जास्त कोरोना संक्रमित आहे. चीनमध्ये झालेल्या एका संशोधनात ही माहिती मिळाली आहे. बीजिंग अकॅडमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस आणि वुहानच्या हुओशेनशान हॉस्पिटलने हा अभ्यास केला. अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. संशोधकांनी  कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील विविध नमुने घेतले. हे वाचा - भारतात कोरोनाव्हायरसचा कहर; मात्र मृत्यूच्या आकडेवारीत आश्चर्यकारक घट संशोधकांना दिसून आलं, जनरल वॉर्डपेक्षा आयसीयूमधील सर्वात जास्त नमुने कोरोना पॉझिटिव्ह होते. आयसीयूमधील 43.5% नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर जनरल वॉर्डमधील फक्त 7.9 टक्के नमुने कोरोना पॉझिटिव्ह आहेत इतर भागाच्या तुलनेत जमिनीवर सर्वात जास्त कोरोनाव्हायरस असल्याचं दिसले. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्या चपलांमार्फत हा कोरोनाव्हायरस पसरतो आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चपलांचे सोल्सच्या निम्म्याहून अधिक नमुन्यांवर कोरोनाव्हायरस सापडलेत. या ठिकाणी सापडले व्हायरस कॉम्प्युटर माऊसवर सर्वात जास्त व्हायरस त्यानंतर आयसीयूमधील 60  टक्के कचऱ्यावर व्हाययरस आयसीयूमध्ये हातात धरली जाणारी उपकरणं 75% संक्रमित रुग्णांच्या बेडचं हँड रेलिंग 43 टक्के संक्रमित दरवाज्यावर 8 टक्के व्हायरस वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे स्लीव कफ्स आणि ग्लोव्हसवरही अनियमित स्तरावर व्हायरस आढळलेत. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - धक्कादायक! कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह
    First published: