Home /News /coronavirus-latest-news /

GOOD NEWS! कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल शेवटच्या टप्प्यात ; 30,000 लोकांवर चाचणी सुरू

GOOD NEWS! कोरोना लशीचं ह्युमन ट्रायल शेवटच्या टप्प्यात ; 30,000 लोकांवर चाचणी सुरू

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

तर या 35 लशींमध्ये 5 प्रयोगांवर जगभरातल्या तज्ज्ञांची आशा एकवटली आहे.

मॉडर्ना कंपनीने (moderna inc) तयार केलेल्या कोरोना लशीचं (corona vaccine) शेवटच्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यात आलं आहे.

    वॉशिंग्टन, 27 जुलै : कोरोनाव्हायरसची लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. जगभरात शंभरपेक्षा अधिक कोरोना लशी बनत आहेत. त्यापैकी काही लशी या ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहे. त्यापैकी एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे आणि 30 हजार जणांना ही लस दिली जाणार आहे. अमेरिकेने तयार केलेली mRNA 1273 ही कोरोना लस. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक (moderna inc) कंपनीने ही लस तयार केली आहे. मॉडर्नाच्या पहिल्या स्टेजच्या ट्रायलमध्ये 45 लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावेळी या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीमध्ये बचाव  दिसून आला होता. ताप आणि वेदनासारखे सौम्य दुष्परिणामही दिसून आले. आता ही लस 30,000 लोकांना दिली जाणार आहे. ज्या लोकांना ही लस दिली जाणार आहे, त्यांना खरी लस दिली जात आहे की डमी याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दोन डोस दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे तपासलं जाणार आहे. हे वाचा - COVID-19 रुग्णांसाठी Good News, टेस्टचा निकाल कळणार आता फक्त 36 मिनिटांमध्ये देशात वापरल्या जाणाऱ्या लशीचे टेस्ट स्वत:च करावं या उद्देशाने अमेरिकेने लशीचं ट्रायल सुरू केलं आहे. प्रगत टप्प्यात असलेल्या कंपनीच्या लशीचं ट्रायल 30 हजार लोकांवर होईल. या महिन्यात मॉडर्ना, पुढील महिन्यात ऑक्सफर्ड, सप्टेंबरमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्टोबरमध्ये नोवावॅक्सच्या लशीचा अभ्यास होईल. फाइजर आयएनसी स्वत:च आपल्या 30 हजार लोकांवर चाचणी करणार आहे. कोरोनाची लस किती सुरक्षित आहे हे या टेस्टमध्ये पाहिलं जाईल. यानंतर शास्त्रज्ञ या लशींची तुलना करतील. हे वाचा - देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी असा आहे मोदी सरकारचा प्लॅन दरम्यान काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं (Oxford corona vaccine) पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (pune serum institute of india)) दिलेल्या माहितीनुसार भारतात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत ही एक हजारपेक्षाही कमी असेल. ही किंमत सर्वसामान्यांनाही परवडण्यासारखी आहे
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या