• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • भारतीयांना मिळणार श्रीमंतांची कोरोना लस; Moderna ला DCGI कडून ग्रीन सिग्नल

भारतीयांना मिळणार श्रीमंतांची कोरोना लस; Moderna ला DCGI कडून ग्रीन सिग्नल

जगातील अनेक श्रीमंत देश मॉडर्ना (Moderna) या लशीचा वापर करत आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 जून: भारतात कोरोनाविरोधी लढ्यात आणखी एका लशीचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna) कंपनीची लस (Corona vaccine) अखेर भारतात मिळणार आहे. या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. लवकरच ही लस आता भारतात आय़ात केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारतातील सिप्ला (Cipla) कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) मॉडर्ना कोरोना लस आयात करण्यासाठी परवानगी मागितली होती. सोमवारील ही परवानगी मागितली होती. डीजीसीआयने हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जगातील अनेक श्रीमंत देत या लशीचा वापर करत आहेत. अमेरिकेतसुद्धा ही लस दिली जाते आहे. ज्याचे फार गंभीर दुष्परिणाम समोर आले नाही आहे. ही लस मॅसेंजर RNA वर आझधारित आहे. जी पेशींना कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी उत्तेजित करते. क्लिनिकल ट्रायलनुसार कोरोनाची लक्षणं दिसणाऱ्या प्रकरणात ही लस 90 टक्के प्रभावी आहे. हे वाचा - ...तर दुसरा डोस 45 आठवड्यांनंतर; आणखी वाढणार कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर? अमेरिका आणि युरोपियन संघ mRNA लशींचा साठा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मर्यादित उत्पादन, जास्त अटी आणि साठवणुकीची अडचण असल्याने कमी उत्पन्न असेलल्या देशांमध्ये या लशीची कमतरता आहे.
  Published by:Priya Lad
  First published: