मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

‘कोरोना काळात करा असं लग्न’; अगदी साधेपणानं लग्नगाठ बांधत आमदारानं दिला खास संदेश

‘कोरोना काळात करा असं लग्न’; अगदी साधेपणानं लग्नगाठ बांधत आमदारानं दिला खास संदेश

एका आमदारानं कोरोना नियमांचं पालन करत अगदी साधेपणानं लग्नगाठ (MLA's Wedding) बांधली आहे. नमन बिक्सल कोनगरी (Naman Bixal Kongari) यांचा गुरुवारी रांचीमध्ये विवाहसोहळा पार पडला.

  • Published by:  Kiran Pharate

रांची 21 मे: एकीकडे देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असताना अनेक लग्नसमारंभ (Marriage Functions During Corona Pandemic) पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. अशात झारखंडच्या एका आमदारानं मात्र हीच संधी साधत लग्नगाठ (MLA's Wedding) बांधली आहे. नमन बिक्सल कोनगरी (Naman Bixal Kongari) यांचा गुरुवारी रांचीमध्ये विवाहसोहळा पार पडला. यातून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांना हे दाखवून दिलं, की अगदी साधेपणानं (Marriage Conducted With Simplicity) आणि केवळ कुटुंबातील माणसांच्या उपस्थितीमध्येही लग्नसोहळा पार पडू शकतो.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारनं नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, लग्नसमारंभामध्ये नवरदेव आणि नवरीसह केवळ 11 लोकांनाच उपस्थित राहाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसंच लग्नांमध्ये लाऊडस्पीकर, डीजे, फटाके इत्यादींचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि लग्नाच्या किमान तीन दिवस अगोदर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये लग्नाविषयी माहिती देणे बंधनकारक केले आहे.

48 वर्षीय आमदारानं सांगितलं, की या लग्नसोहळ्यासाठी त्यांच्याकडील केवळ पाच लोकं सहभागी होते. यात त्यांची मुलगी, दोन बहिणी, एक साक्षीदार आणि एका मित्राचा समावेश होता. तर, नवरी मधू हिच्या घरचे सहा लोक उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे आमदाराची पंधरा वर्षांची मुलगी या अनोख्या विवाहसोहळ्याची साक्षीदार होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आमदारानं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आमदार आणि खासदार यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर लग्नसमारंभातील उपस्थितीबाबत नियमावली जाहीर करुन लग्नसोहळ्यांच्या आयोजनाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी हे नियम पायदळी तुडवले जात असल्याचं कोनगरी यांनी सांगितलं. कोनगिरी हे कोलेबिरा मतदारसंघातून 2019 मध्ये निवडून आले आहेत. ते म्हणाले की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कोणताही समुदाय विवाहसोहळ्याच्या तारखा पुढे ढकलणं अशुभ मानतात. त्यामुळे, मी ठरलेल्या दिवशीच लग्नगाठ बांधत ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं ठरवलं.

First published:

Tags: Corona virus in india, Lockdown, Wedding