Home /News /coronavirus-latest-news /

घाबरू नका! Delta Plus कोरोनालाही टक्कर देणं शक्य; मोदी सरकारला गवसला आशेचा किरण

घाबरू नका! Delta Plus कोरोनालाही टक्कर देणं शक्य; मोदी सरकारला गवसला आशेचा किरण

कोरोना लसही डेल्टा प्लस (Delta plus) कोरोना व्हेरिएंटवर प्रभावी ठरणार नाही, असं सांगितलं जात असताना, एक मार्ग सापडला आहे.

    नवी दिल्ली, 26 जून : गेल्या काही दिवसांपासून डेल्टा प्लस (Delta plus)  कोरोना व्हेरिएंटची (Corona variant) प्रकरणं समोर येत आहेत. कोरोनाच्या या व्हेरिएंटवर लसही प्रभावी ठरणार नाही, असं सांगितलं जातं. तसंच या व्हेरिएंटमुळे आता तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवली जाते आहे. त्यामुळे आता डेल्टा प्लस व्हेरिएंटशी दोन हात कसे करता येतील, यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यातच केंद्र सरकारला एक आशेचा किरण गवसला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कोरोना लस प्रभावी ठरणार नाही, असं सांगितलं जात असताना नवी दिल्लीतील एम्सचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr Randeep Guleria) यांनी मात्र दोन वेगवेगळ्या कोरोना लशी (Mixing doses of two different vaccines) डेल्टा प्लसला टक्कर देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे. हे वाचा - परिस्थिती गंभीर! 8 राज्यांतच डेल्टाची 50% प्रकरणं; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात एनडीटीव्हीशी बोलताना एम्सचे डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं, डेल्टा प्लस आणि डेल्टासारख्या जास्त संसर्गजन्य आजाराशी दोन वेगवेगळ्या कोरोना लशी एकत्र करून लढणं शक्य आहे. पण दोन कोरोना लशी एकत्र देण्यासाठी अधिक डेटाची गरज आहे. पर्याय म्हणून दोन कोरोना वेगवेगळ्या कोरोना लशी देता येऊ शकतात. पण चांगल्या परिणामासाठी कोणत्या दोन कोराना लशी द्यायला हव्यात याचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. यामुळे कोरोना लशीचा प्रभाव वाढेल. कोरोना लसीकरण योजनेचा भाग म्हणून तज्ज्ञ दोन कोरोना लशी एकत्र दिल्याने काय परिणाम होऊ शकतो, त्याची परिणामकता वाढते का. याचा अभ्यास करणार आहे. असं गेल्या महिन्यात केंद्र सरकारने सांगितलं होतं. हे वाचा - कोरोना महासाथीत लहान मुलांची चिंता नको; सिरम इन्स्टिट्यूटने दिली GOOD NEWS! देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 51 रुग्ण सापडले आहेत. सर्वाधिक 22 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तमिळनाडूत 9, मध्य प्रदेशात 7, पंजाबात 2, गुजरातेत 2, केरळमध्ये तीन, तर आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या राज्यांत डेल्टा प्लसचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात नवे दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. केवळ आरटीपीसीआर चाचण्यांच्या आधारे निर्बंध हळूहळू शिथिल किंवा कडक केले जाणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्यास निर्बंध कडक केले जाऊ शकतात, असे संकेत देण्यात आले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या