Home /News /coronavirus-latest-news /

Corona Vaccine घेऊनही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; AIIMS च्या माजी संचालकांनी सांगितलं कारण

Corona Vaccine घेऊनही मंत्री कोरोना पॉझिटिव्ह; AIIMS च्या माजी संचालकांनी सांगितलं कारण

या घटनेमुळे लशीच्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

    नवी दिल्ली, 5 डिसेंबर :  Covid-19 ट्रायलदरम्यान कोरोनाची लस घेतल्याच्या 15 दिवसांनंतर हरियाणाचे गृह आणि आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij) यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण हैराण झाले आहेत. या घटनेमुळे लशीच्या परिणामाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे की, अनिल विज यांची चाचणी कोरोना पॉजिटिव्ह (Corona Positive) होऊ शकतात आणि यासाठी लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे (AIIMS) माजी संचालक एमसी मिश्र म्हणाले की, अनिल विज यांनी 20 नोव्हेंबर रोजी लशीच्या ट्रायलदरम्यान लस घेतली होती. मात्र त्यानंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामागे दोन कारणं असू शकतात. पहिले म्हणजे कोणत्याही लशीच्या ट्रायवदरम्यान काही लोकांना प्लासीबो दिला जातो आणि काहींना लस दिली जाते. हे सांगितले जात नाही, तर केवळ डेटामध्ये लिहिले जाते. एमसी मिश्र यांनी यावर सांगितलं की, अशी शक्यता आहे की, अनिल विजयांना प्लासीबो देण्यात आला असावा, अशात ते पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. दुसरे कारण म्हणजे अनिल विज यांना लशीचा डोस दिला गेला, मात्र कोणत्याही लशीचा परिणाम दिसण्यासाठी 28 दिवसांचा अवधी लागतो. 28 दिवसात शरीरात एँन्टीबॉडीज तयार होतात. अशात अनिल विज यांना लस घेऊन अद्याप 15 दिवस पूर्ण झाले आहेत. यादरम्यान शरीरात अद्याप अँन्टीबॉडीज तयार झालेल्या नाहीत आणि त्यांना कोरोनाची लागण झाली. मिश्र पुढे म्हणतात की, 15 दिवसात कोणत्याही लशीचा परिणाम दिसत नाही. अशात आता लशीच्या वापरावर सवाल उपस्थित करणे योग्य नाही. असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही लशीच्या क्षमतेविषयी सवाल उपस्थित करणे योग्य नाही. भारत बायोटेकच्या संबंधात डेटा पाहतील आणि विज यांच्याबाबत माहिती देतील.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या