मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'मास्क वापरणं वेडेपणा; कोरोनाला आंतरराष्ट्रीय कट!' म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

'मास्क वापरणं वेडेपणा; कोरोनाला आंतरराष्ट्रीय कट!' म्हणणाऱ्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना रुग्ण बरे होण्याची...

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भीती एकीकडे वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे, राज्य आता कोरोना रुग्ण बरे होण्याची...

MD रेडिओलॉजिस्ट असलेल्या या डॉक्टरांचे video गेल्या वर्षी प्रचंड viral झाले होते. Covid-19 ची साथ हे थोतांड आहे, मास्क वगैरे काही वापरायची गरज नाही, असं या डॉक्टरांनी VIDEO तून सांगितलं होतं.

नवी दिल्ली, 23 जुलै : 2020 मध्ये आलेल्या कोरोना महासाथीला (Coronavirus Pandemic) थोतांड म्हणत, त्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या दिल्लीमधील एका डॉक्टरविरुद्ध जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. तरुण कोठारी (Dr. Tarun Kothari) हे आपल्या व्हिडिओंमधून गेला वर्षभर लोकांना सांगत होते की, कोरोना महामारी हा आंतरराष्ट्रीय कट आहे आणि तुम्ही मास्क वापरू नका. यात सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल तसंच इतर गुन्ह्यांअंतर्गत दिल्ली क्राइम ब्रँचच्या (Delhi Crime Branch) सायबर सेलने स्वतःच डॉ. कोठारी यांच्याविरुद्ध एफआयआऱ दाखल केला आहे.

लोकांना केलं होतं मास्क न वापरण्याचं आवाहन

एमडी रेडिओलॉजिस्ट डॉ. तरुण कोठारी यांचे व्हिडिओ मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वीच कोठारी यांनी एक नवा व्हिडिओ पोस्ट केला होता.

भारतावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावट, या 13 राज्यात वाढतोय धोका

(Dr. Kothari New Video) यामध्ये ते म्हणाले होते, “पंतप्रधान, पोलीस आयुक्त, आयएएस ऑफिसर किंवा पत्रकार हे सर्व जरी मास्क वापरण्यास सांगत असतील; तरी तुम्ही आजिबात मास्क वापरू नका. (Stop Wearing mask) मास्कचा वापर केल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवेल. त्यामुळे तुम्हाला श्वसनासंबंधी आजार होतील. यासाठी तुम्ही रुग्णालयात दाखल झालात, तर तुमच्यावर चुकीचे उपचार केले जातील आणि तुमचा मृत्यू झाल्यानंतर तुमची गणना कोरोना बळीत होईल. त्यामुळे मास्क वापरणं सोडा, आणि या व्हिडिओला देशभरात व्हायरल करा.”

यासोबतच, कोठारींनी आपल्या इतर व्हिडिओंमध्ये लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याचं, तसंच कोरोना प्रतिबंधक लसही (Corona Vaccine) न घेण्याचे आवाहन केले आहे. कोठारी म्हणतात, की कोरोना हा जीवघेणा आजार नसून, एक साधारण फ्लू (Common Flu) आहे. याला महामारी म्हणणे हा एक आंतरराष्ट्रीय कट आहे.

विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता दिल्लीतील सायबर सेलने कोठारींविरुद्ध जामीनपात्र गुन्हे दाखल करुन तपास सुरू केला आहे. कोठारी यांच्यावर कलम 109 म्हणजे गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, कलम 117 म्हणजे दहापेक्षा अधिक लोकांना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे, कलम 188 म्हणजे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, आणि कलम 269 म्हणजे जाणूनबुजून एखाद्याचे आयुष्य धोक्यात आणणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा व्हिडिओंमुळे जुनी अकाऊंट्स झाली बंद

कोठारी यांच्या अशा व्हिडिओंमुळे त्यांची यापूर्वीची दोन सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्यात आली आहेत.

कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पोहोचला 124 देशांत, जगभरात चिंता वाढली

यानंतर त्यांनी आता आणखी एक नवे अकाऊंट उघडून त्यावरुन व्हिडिओ पोस्ट केला होता. यापूर्वीच्या अकाऊंट्सवर त्यांना हजारो लोक फॉलो करत होते. आपल्या जुन्या अकाऊंट्ससोबत त्यांनी आपले हजारो फॉलोअर्सदेखील गमावले असले, तरी कोरोना विरुद्धचे हे आंदोलन आपण सुरूच ठेवणार असल्याचे कोठारींनी म्हटले आहे.

First published:

Tags: Coronavirus, Delhi, Face Mask