• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • मिस्टर इंडिया मराठमोळ्या बॉडीबिल्डरचा कोरोनामुळं मृत्यू

मिस्टर इंडिया मराठमोळ्या बॉडीबिल्डरचा कोरोनामुळं मृत्यू

तो केवळ 34 वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. बडोद्यामधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

 • Share this:
  मुंबई 30 एप्रिल: कोरोना विषाणूचं (coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणामुळं आतापर्यंत देशभरातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक नामांकित सेलिब्रिटींना देखील कोरोनामुळं मरताना आपण पाहिलं आहे. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. प्रसिद्ध बॉडीबिल्डर जगदीश लाड (Bodybuilder Jagdish Lad) याचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तो केवळ 34 वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. बडोद्यामधील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. जगदीश हा मुळचा सांगली जिल्ह्यात राहणारा होता. बॉडीबिल्डींगसाठी तो मुंबईत आला. त्यानं नवी मुंबई महापौर श्री हा किताब जिंकून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यानं महाराष्ट्र श्री आणि मिस्टर इंडिया यांसारख्या नामांकित स्पर्धा देखील जिंकल्या होत्या. त्यानं आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्येही भारताचं प्रतीनिधित्व केलं होतं. परंतु सुदृढ बॉडीबिल्डरचा कोरोनानं घात केला. अगदी काही दिवसांतच त्याचं आयुष्य संपवलं. जगदीशच्या मृत्युमुळं बॉडीबिल्डींग क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे या मराठमोठ्या तरुणाला श्रद्धांजली वाहिली आहे. Covid Vaccination: महाराष्ट्र दिनी 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होण्याचे संकेत भारतात रुग्णसंख्येत थोड्या प्रमाणात घट झाल्याने दिलासा मिळालेला असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशात गेल्या 24 तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 3293 रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, दैनंदिन रुग्णसंख्याही पुन्हा एकदा वाढली असून गेल्या 24 तासांत 3 लाख 60 हजार 960 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: