Home /News /coronavirus-latest-news /

चिंताजनक! कोरोना वाढतोय मात्र रोगप्रतिकारशक्ती होतीये कमी, संशोधनातून आलं समोर

चिंताजनक! कोरोना वाढतोय मात्र रोगप्रतिकारशक्ती होतीये कमी, संशोधनातून आलं समोर

लोकांच्या मनात असाही प्रश्न उपस्थित होत आहे, की कोरोनाविरोधात प्रतिकार करण्यासाठी शरीरात किती काळापर्यंत नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Immunity) टिकून राहाते. एकूण संक्रमित लोकांपैकी 20 ते 30 टक्के लोकांनी 6 महिन्यांनंतर ही नैसर्गिक प्रतिकारशक्ती गमावली आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 11 एप्रिल : देशात कोरोना (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. यादरम्यान रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण (Covid 19 Vaccine) मोहिमेला आणखी वेग देण्यात येत आहे. यादरम्यान लोकांच्या मनात असाही प्रश्न उपस्थित होत आहे, की कोरोनाविरोधात प्रतिकार करण्यासाठी शरीरात किती काळापर्यंत नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Immunity) टिकून राहाते. इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या (IGIB) अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे, की कोरोना विषाणूविरूद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमीत कमी 6 ते 7 महिन्यांपर्यंत कायम राहाते. परंतु, एकूण संक्रमित लोकांपैकी 20 ते 30 टक्के लोकांनी 6 महिन्यांनंतर ही नैसर्गिक प्रतिकारशक्ती गमावली आहे. COVID-19 चे भय संपता संपेना! शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेचा कोरोनामुळे मृत्यू आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अभ्यासात असे आढळले आहे की 20 ते 30 टक्के लोकांच्या शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. डॉ. अग्रवाल म्हणतात, की 6 महिन्यांचा हा अभ्यास हे माहिती करून घेण्यासाठी उपयुक्त ठरला आहे, की मुंबईसारख्या शहरांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी असतानाही कोरोनाचा प्रसार वाढत का आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा, कडक लॉकडाऊनमध्ये गावाला जाण्यास मुभा? हे संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण यावरुनच हे समजू शकतं की देशात कोरोनाची दुसरी लाट केव्हापर्यंत राहिल. हे लसीकरणाचं महत्तव दाखवून देतं. शोध अजूनही सुरुच आहे. मात्र, सध्याच्या काळात अनेक अशा लसी आहेत, ज्या कोरोनासोबत लढण्यासाठी आणि मृत्यूपासून वाचण्यासाठी महत्तवपूर्ण समजल्या जात आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की या शोधामुळं दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये लोकांच्या शरीरामध्ये अधिक सिरोपॉझिटिव्हीटी असूनही अधिक केस समोर का येत आहेत, हे समजण्यास मदत होईल. आयजीआयबीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शांतनू सेन गुप्ता यांनी सांगितलं, की सप्टेंबरमध्ये आम्ही सीएसआयआरच्या लॅबमध्ये सिरो सर्व्हे केला होता. यात केवळ दहा टक्के लोकांच्याच शरीरामध्ये या विषाणूविरोधात लढण्यासाठी अॅन्टीबॉडी आढळून आल्या. आम्ही यावर तीन ते सहा महिने लक्ष ठेवलं आणि तपास केला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona, Corona spread, Corona virus in india

    पुढील बातम्या