Covid Vaccination: कोरोना लस घ्या आणि विविध ऑफर्सचा लाभ मिळवा, पाहा कुठे काय Offer

Covid Vaccination: कोरोना लस घ्या आणि विविध ऑफर्सचा लाभ मिळवा, पाहा कुठे काय Offer

भारतासह अनेक देशांमध्ये लोकांनी लस घ्यावी यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स (Offers) दिल्या जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 एप्रिल: देशात कोरोनाचा (Corona) संसर्ग वेगाने फैलावत आहे. जगभरातील वैज्ञानिक मास्क (Mask), सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) आणि लसीकरण (Vaccination) या तीन गोष्टींना कोरोनाविरोधातील हत्यार मानत आहेत. त्यामुळेच सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीकरणावर भर दिला जात आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लोकांनी लस घ्यावी यासाठी अनेक प्रकारच्या ऑफर्स (Offers) दिल्या जात आहेत. राजधानी दिल्लीतील महानगरपालिका ज्या नागरिकांनी लस घेतली आहे त्यांना करात अतिरिक्त 5 टक्के सूट देत आहे. रशियामध्ये आईस्क्रिम, इस्त्राईलमध्ये कोल्ड ड्रिंक आणि पिझ्झा, पेस्ट्री हे पदार्थ मोफत दिले जात आहेत. तिकडे अमेरिकेत लस घेतलेल्या व्यक्तीला व्हिडीओ गेम फ्री आणि अन्य वस्तूंवर मोठे डिस्काऊंट दिले जात आहेत.

देशातील बहुतांश भागात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) गंभीर रुप धारण करताना दिसत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचं वैज्ञानिकांचं देखील म्हणणं आहे. अनेक कंपन्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आपल्या कर्मचाऱ्यांना 250 डॉलर म्हणजेच 18,500 रुपये बोनस आणि दोन दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर Modi सरकार आखत आहे masterplan

लस घेतल्यावर कोणत्या देशात काय आफर्स दिल्या जात आहेत जाणून घेऊया...

1) जपानमध्ये (Japan) प्रभारी लसीकरण मंत्री तारो कोनो यांनी एका मुलाखतीत सांगितले की, देशात लसीकरण वाढवण्यासाठी लोकप्रिय डिश ग्योझाचे वाटप करण्याविषयी विचार करीत आहोत.

2) जगभरातील अन्य देशदेखील कोरोनाची लस घेतल्यावर अनेक ऑफर्स देत आहेत. दुबईतील (Dubai) तीन मोठ्या रेस्टॉरंटने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 90 टक्के आणि दुसरा डोस घेतल्यानंतर 80 टक्के सूट देण्याची ऑफर दिली आहे.

3) मेक्सिकोत (Mexico) लोकांना लसीकरण केंद्रावर पोहोचता यावे याची विशेष काळजी घेतली जात आहे. कोविड सेंटरवर पोहोचल्यानंतर लोकांना त्यांची मनपसंत संगीताची धून (Music Tune) ऐकवली जात आहे.

4) लसीकरणाच्या अनुषंगानं सर्वाधिक ऑफर्स अमेरिकेत दिल्या जात आहेत. मॅकडोनाल्ड्स, एटी अॅण्ड टी, इन्साकार्ट, ट्रेडर जोस, कोबानी सारख्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी आणि रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेत लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना 30 डॉलर म्हणजेच 2200 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

5) गुजरातमध्ये (Gujarat) सोनी समाजाच्या लोकांनी कोरोना सेंटरवर आलेल्या नागरिकांना सोन्याची नथ देण्याची घोषणा केली आहे. सोनी समाजाने आतापर्यंत 1331 महिलांना लस घेतली म्हणून सोन्याची नथ तर पुरुषांना हॅण्डब्लेंडरचे वाटप केले आहे.

First published: April 15, 2021, 6:55 PM IST

ताज्या बातम्या