कन्नूर 23 मे : कोरोनामुळे देशातील स्थिती (Corona in India) गंभीर आहे. सरकारी आकडेवारीनुसार काही राज्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आजही मृतांची आकडेवारी चिंताजनक आहे. या काळात अनेक ठिकाणी माणुसकीही लोप पावल्याचं दिसतं. अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना (Corona Patient) किंवा त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्यास लोक पुढे येत नाहीत. अशा बिकट काळात एका रिक्षाचालकानं आपल्या रिक्षातून 500 हून अधिक कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या घरी पोहचवण्याचं महत्त्वाचं का केलं आहे.
प्रेमचंद्रन (वय 51) असं या रिक्षाचालकाचं नाव असून या काळात त्यांची रिक्षा म्हणजे जणू ॲम्बुलन्स झाली आहे. वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला मी एका गर्भवती कोरोनाबाधित महिलेला रुग्णालयामध्ये पोचवण्याचे काम केले. त्यानंतर विविध ठिकाणांहून लोक मला कोराना रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी फोन करू लागले. लोकांची अडचणी समजून घेऊन मी लगेच त्यांना रिक्षाची सेवा देत होतो. कोणत्याही रुग्णाला दवाखान्यात पोहोचल्यानंतर रिक्षाची पूर्ण स्वच्छता केली जात होती. सॅनिटायजर आणि डिटर्जंटचा वापर करून पूर्ण रिक्षा सॅनिटाईज केली जाते. कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही खबरदारी घेतो. रुग्णांची वाहतूक करत असल्यानं स्वच्छता ठेवणं गरजेच आहे.
कोरोनाच्या या बिकट काळात ते लोकांसाठी सेवा देत असले तरी त्यांचे कुटुंबही त्यांना या कामात मदत करत असून त्यांच्या या कामाला घरच्यांचा पाठिंबा असतो. त्यांच्या या सेवाभावी कामामुळं कुन्नुर केरळमध्ये त्यांच्या कामाचं लोक कौतुक करत आहेत.
हे वाचा - बलात्काराच्या घटनेनंतर 8 वर्षांनी आरोपीनं केला पीडितेला मेसेज, मजकूर पाहून हादरली तरुणी
दरम्यान, महाराष्ट्रात आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार शनिवारी राज्यात 40 हजार 294 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात 51 लाख 11 हजार 09 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असले तरी, उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात 24 तासांत 682 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 24 तासात 26 हजार 133 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus