मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

खेडेगावातील उद्योजकानं तयार केलं Ventilator; अर्ध्या किमतीत मिळणार, आरोग्य मंत्रालयानं दिली मंजुरी

खेडेगावातील उद्योजकानं तयार केलं Ventilator; अर्ध्या किमतीत मिळणार, आरोग्य मंत्रालयानं दिली मंजुरी

हा व्हेंटिलेटर (Ventilator) युरोपच्या धर्तीवर बनवला असल्याचा दावा या उद्योजकानं केला आहे. हा व्हेंटिलेटर बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत खूप स्वस्त असून याचा वापर खेडेगावांमध्येही सहज केला जाऊ शकतो.

हा व्हेंटिलेटर (Ventilator) युरोपच्या धर्तीवर बनवला असल्याचा दावा या उद्योजकानं केला आहे. हा व्हेंटिलेटर बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत खूप स्वस्त असून याचा वापर खेडेगावांमध्येही सहज केला जाऊ शकतो.

हा व्हेंटिलेटर (Ventilator) युरोपच्या धर्तीवर बनवला असल्याचा दावा या उद्योजकानं केला आहे. हा व्हेंटिलेटर बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत खूप स्वस्त असून याचा वापर खेडेगावांमध्येही सहज केला जाऊ शकतो.

पाटणा 06 मे: असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाविरोधात (Coronavirus) लढत आहे. या वर्षभरात आपण अनेक नवीन गोष्टींचे अनुभव घेतले. साधं पीपीई किट (PPE Kit) माहित नसलेल्या देशात मास्क (Mask)आणि किटचा तुटवडा भासल्यानंतर याचं उत्पादन करण्यास सुरुवात झाली. तसंच व्हेंटिलेटर (Ventilator) आणि इतर वस्तूंची निर्मिती व्हायला लागली. अनेकांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून अगदी स्वस्तात वस्तू निर्माण केल्या. अशातच इंदौरच्या एका उद्योजकानं सर्वात स्वस्त व्हेंटिलेटर बनवलाय.

या उद्योजकानं त्यांच्या वैज्ञानिक मित्रांच्या मदतीने याची निर्मिती केली आहे. हा व्हेंटिलेटर युरोपच्या धर्तीवर बनवलं असल्याचा दावा या उद्योजकानं केला आहे. हा व्हेंटिलेटर बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत खूप स्वस्त असून याचा वापर खेडेगावांमध्येही सहज केला जाऊ शकतो. संजय पटवर्धन असं या उद्योजकाचं नाव आहे. देशातील व्हेंटिलेटरचा तुटवडा पाहिल्यानंतर त्यांना हा नवीन शोध लावण्यास प्रेरणा मिळाली.

मार्केटमधील इतर व्हेंटिलेटरपेक्षा स्वस्त –

संजय पटवर्धन यांनी तयार केलेला व्हेंटिलेटर मार्केटमध्ये (market)उपलब्ध असलेल्या इतर व्हेंटिलेटरपेक्षा स्वस्त आहे. सध्या कोरोनाच्या काळात बऱ्याच ठिकाणी औषधांसह इतर वस्तूंसाठी नागरिकांची लूट केली जात आहे. अशा परिस्थितीत संजय पटवर्धन यांनी तयार केलेला हा व्हेंटिलेटर लोकांसाठी फायदेशीर ठरू शकेल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची मंजुरी –

संजय पटवर्धन यांना त्यांच्या मित्राच्या मदतीने हे व्हेंटिलेटर बनवण्यासाठी 10 महिने लागले. सरकारने निश्चित केलेली सर्व मानकं या व्हेंटिलेटरने पूर्ण केली असून त्यासंबंधीची कागदपत्रांची प्रक्रियाही संपली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या व्हेंटिलेटरला (Sanctioned by Union Ministry of Health) मंजुरी दिली आहे. युरोपियन मानकांनुसार, जीवनरक्षक उपकरणे नेहमीच पारदर्शक असावीत, जेणेकरुन रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मशीनची सक्रियता दिसू शकेल. या मशीनमध्ये याबाबत विशेष काळजी घेण्यात आली आहे.

व्हेंटिलेटरची वैशिष्ट्ये –

हा नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेटर आहे. यामध्ये पाईप नाकापर्यंत जातो. याची किंमत 50 हजार रुपये आहे. मार्केटमध्ये मिळणाऱ्या व्हेंटिलेटरची किंमत एक लाखांपेक्षा जास्त असते. या व्हेंटिलेटरचं वैशिष्ट्य म्हणजे, यामध्ये ऑक्सिजनचा जास्त फ्लो लागत नाही. कमी फ्लोवर हा व्हेंटिलेटर काम करतो. तसंच ऑक्सिजन संपल्यास काही तास हा व्हेंटिलेटर वातावरणातील ऑक्सिजन घेऊन तो रुग्णाला देऊ शकतो. तसेच याचं वजन फक्त 2 किलो आहे.

कोण आहेत पटवर्धन यांना मदत करणारे मित्र -

डॉक्टर भंडारी दाम्पत्याने ही कल्पना मांडली होती. त्यांच्यासोबतच केटचे रिटायर्ड शास्रज्ञ अनिल ठिपसे यांच्या मदतीने पटवर्धन यांनी हा व्हेंटिलेटर बनवलाय. सुरुवातीला त्यांनी फक्त 5 व्हेंटिलेटर बनवले होते. ते विकले गेलेत. त्यामुळे आणखी 50 व्हेंटिलेटर बनवणार असल्याचं पटवर्धन यांनी सांगितलं.

‘मी एका खेडेगावात मोठा झालोय. त्यामुळे हे मशीन बनवताना ग्रामीण भागाला लक्षात ठेवून ते बनवलं. त्यामुळे ते स्वस्त आहे. बऱ्याचदा ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करताना व्हेंटिलेटरची गरज भासते. अशावेळी आम्ही तयार केलेलं मशीन त्यांची मदत करू शकेल. या व्हेंटिलेटरसाठी आवश्यक कागदपत्रांची आणि लायसन्सची पूर्तता आम्ही केली असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याच्या वापरासाठी परवानगी दिली आहे,’असं संजय पटवर्धन यांनी सांगितलं.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Covid-19, Health, India