मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Positive Story: कोरोना झाला तरी घाबरू नका, या 100 पार केलेल्या आजी-आजोबांकडे पाहा

Positive Story: कोरोना झाला तरी घाबरू नका, या 100 पार केलेल्या आजी-आजोबांकडे पाहा

110 वर्षांचे रामानंद आणि 100 वर्षांच्या सीतारवम्मा यांनी दाखवून दिलं आहे की, मानसिक सामर्थ्याच्या बळावर कोविडसारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं. कोरोनावर मात केली आहे.

110 वर्षांचे रामानंद आणि 100 वर्षांच्या सीतारवम्मा यांनी दाखवून दिलं आहे की, मानसिक सामर्थ्याच्या बळावर कोविडसारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं. कोरोनावर मात केली आहे.

110 वर्षांचे रामानंद आणि 100 वर्षांच्या सीतारवम्मा यांनी दाखवून दिलं आहे की, मानसिक सामर्थ्याच्या बळावर कोविडसारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं. कोरोनावर मात केली आहे.

    हैदराबाद, 18 मे: देशभरात सध्या पसरलेल्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट(Corona Second Wave)अतिशय प्राणघातक ठरली आहे. अत्यंत वेगानं वाढलेल्या रुग्णसंख्येनं आरोग्य यंत्रणा कोलमडून टाकली. ऑक्सिजनच्या तुटवड्यानं हे संकट अधिकचं भीषण केलं. ऑक्सिजनअभावी अनेकांचा जीव गेला. या लाटेत कमी वयाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यामुळं देशभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भीतीमुळे अनेक तरुण रुग्णांची इच्छाशक्तीदेखील दुबळी ठरत असल्यानं या आजाराला ते सहज बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत प्रेरणादायी ठरत आहेत ते शतकाचा उंबरठा पार करूनही विजिगीषू वृत्तीनं कोरोनासारख्या भयंकर आजाराला हरवणारे रामानंद तीर्थ(Ramananda Theertha)आणि सीतारवम्मा(Sithavaramma)यांच्यासारखे लोक. मानसिक सामर्थ्य आणि धैर्याच्या बळावर कोरोनासारख्या आजारालाही सहज पराभूत करता येतं, याचं उत्कृष्ट उदाहरण या दोघांनी सर्वांसमोर ठेवले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना या आजाराशी दोन हात करताना प्रेरणा मिळणार आहे हे नक्की.

    लसीमुळे कोरोनापासून 97.38 टक्के मिळतंय संरक्षण, प्रकृती बिघडण्याची शक्यताही कमी

    हैदराबादमधील(Hyderabad)110 वर्षांचे रामानंदतीर्थ आणि श्रीकाकुलम(Shrilkakulam)इथल्या 100वर्षांच्या सीतारवम्मायांनी या वयात कोविड-19 वर यशस्वी मात करून संपूर्ण देशासमोर आदर्श ठेवला आहे. कोरोनातून बरे झालेले इतक्या मोठ्या वयाचे हे पहिलेच वयोवृद्ध नागरिक आहेत.

    केंद्रानं मार्च 2021 मध्ये जारी केलेल्या एका अहवालात, कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांमध्ये 88 टक्के रुग्ण हे 45 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील आहेत. तर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये 65 वर्षांवरील रुग्णांची संख्या जास्त असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर रामानंदतीर्थ आणि सीतारवम्मा यांचं उदाहरण सकारात्मकता वाढवणारं आहे.

    Corona लस घ्या आणि 10 लाखांचे बक्षीस मिळवा, या ठिकाणी उपलब्ध आहे Bumper Offer

    तेलंगणा(Telangana)राज्यातील हैदराबादमधील किसारा(Keesaara)भागातील एका वृद्धाश्रमात(Old Age Home)राहणाऱ्या 110 वर्षांच्या रामानंद तीर्थ यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानं 24 एप्रिल रोजी सिकंदराबाद इथल्यागांधी रुग्णालयात(Gandhi Hospital)दाखल करण्यात आलं होतं. 18 दिवस मृत्यूशी झुंज देऊन रामानंदतीर्थ यांनी अखेर त्याला पिटाळून लावलं. डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करून रामानंदतीर्थ यांनी नियमितपणे औषधं आणि आहार घेतला. तसंच या काळात त्यांची वृत्ती अतिशय सकारात्मक होती, अशी माहिती या रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. राजा राव यांनी दिली. उपचारानंतर रामानंद तीर्थ यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही काही दिवस त्यांना रुग्णालयातच निगराणीखाली  ठेवण्यात आलं होतं. ते पूर्णपणे ठणठणीत बरे झाल्यानंतर त्यांना परत पाठवण्यात आल्याचं डॉ. राव यांनी सांगितलं.

    राज्यातील 'या' गावाने करून दाखवलं; 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण

    गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी रामानंद तीर्थ यांचा एक व्हिडिओ तयार केला असून त्यात ते त्यांचे वय आणि त्यांनी कोरोनावर केलेली मात याविषयी बोलत आहेत. सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्येही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोन दशके हिमालयात घालवलेल्या आणि एक धर्मोपदेशक म्हणून आयुष्यभर काम केलेल्या रामानंद तीर्थ यांना या वयातही कोणतीही व्याधी नाही. रामानंद तीर्थ यांनी गांधी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचे उत्तम उपचार आणि सेवेबद्दल आभार मानले आहेत.

    अशीच कथा आहे श्रीकाकुलम जिल्ह्यातील 100 वर्षांच्या यल्ला सीतारवम्मा(Yalla Sithavaramma)यांची. महिलेने जवळजवळ तीन आठवड्यांत कोरोना संक्रमणाला मात देऊन विक्रम केला. कुम्मरीगुंटा मंडळातील सरावाकोटा गावच्या यल्ला सीतारवम्मा यांनी या आजाराला न घाबरता अत्यंत खंबीरपणे तोंड दिलं आणि 25 दिवसांच्या लढाईनंतर अखेर त्याच्यावर मात केली. उपमुख्यमंत्री(Deputy Chief Minister)धर्मना कृष्णा दास आणि स्थानिक आमदार धर्मना प्रसाद राव यांच्या थोरल्या आई असलेल्या सीतारवम्मा यांना गेल्या महिन्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला.

    कोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाल्यास पहिला डोस पुन्हा घ्यायचा का?

    आरटीपीसीआर चाचणीतत्यांना कोविड-19 झाल्याचं निष्पन्न झालं. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी न चुकता व्यवस्थित औषधं आणि आहार घेतला आणि त्या आजारातून पूर्ण बऱ्या झाल्या.

    सरावकोटा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. भार्गव प्रसाद यांनी सांगितलंकी, शंभर वर्षांच्या या वृद्ध महिलेनं अतिशय धैर्यानं आणि दृढ निश्चयानं या रोगाला तोंड दिलं. कुटुंबातील सदस्यांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांना प्रोत्साहन देत, त्यांची सेवा करत या आजारावर मात करण्यास मदत केली.

    First published:

    Tags: Corona patient, Coronavirus