Home /News /coronavirus-latest-news /

घरामध्ये या गोष्टींचा करा धूर, कोरोना विषाणूही राहील दूर; AYUSH मंत्रालयाने दिली ही माहिती

घरामध्ये या गोष्टींचा करा धूर, कोरोना विषाणूही राहील दूर; AYUSH मंत्रालयाने दिली ही माहिती

कोरोनापासून वाचण्यासाठी इतर मार्गांसोबतच आयुष मंत्रालयानं घरात धूर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी प्रतिजैविक गुणधर्म असलेल्या विविध वस्तू वापरण्याची शिफारस केली आहे. उदाहरणार्थ, कडुनिंब आणि मोहरीच्या पानांचा धूर.

    नवी दिल्ली, 16 डिसेंबर : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराचे रुग्ण भारतात वाढत आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकारने लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक स्वदेशी मार्ग सांगितला आहे. याची माहिती आयुष मंत्रालयाच्या 'होलिस्टिक हेल्थ अँड वेल बिइंग' अॅडव्हायझरीमध्ये देण्यात आली आहे. मंत्रालयाने कोरोनाला रोखण्यासाठी काही आयुर्वेदिक पद्धती आणि सल्ल्याची माहिती दिली आहे. हे उपाय सामाजिक अंतर, मास्क, लसीकरण यासोबत महत्तवाचे आहेत. या सल्ल्यामध्ये घरात काही वस्तूंचा धूर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी या आयुर्वेदिक पद्धतीबद्दल जाणून घेऊया (कोविड-19 टाळण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स). कोविड-19 टाळण्यासाठी घरात धूप लावा कोरोनापासून वाचण्यासाठी इतर मार्गांसोबतच आयुष मंत्रालयानं घरात धूर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यासाठी प्रतिजैविक गुणधर्म असलेल्या विविध वस्तू वापरण्याची शिफारस केली आहे. उदाहरणार्थ, कडुनिंब आणि मोहरीच्या पानांचा धूर, लोबान धूप खड्यांचा धूर, कापूर किंवा तूप इ. याशिवाय, आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरी अपराजिता धूप चूर्णाचा धूर करण्याचा सल्ला दिला आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम धूर करण्यासाठी भांडं घ्या. धूपपात्र असल्यास ते घ्यावे. यानंतर त्यामध्ये नारळाच्या करवंटीचे किंवा लाकडाचे निखारे तयार करावेत. हे वाचा - तुमचं कार्ड ATM मध्ये अडकलं टेन्शन नका घेऊ; सोप्या पद्धतीने पुन्हा मिळवा तुमचं कार्ड आता त्यावर थोडी अपराजिता धूप पावडर शिंपडा आणि घराच्या आत चांगला धूर करा. पावडर पूर्णपणे जळून गेल्यावर आणखी थोडी पावडर घाला. लक्षात ठेवा की कोरोनापासून बचाव करण्यासाठी तुम्ही जिथे धूर करत आहात, तिथे हवा खेळती ठेवण्याची पूर्ण व्यवस्था असावी. हे वाचा - Omicron च्या दहशतीत दिलासादायक बातमी! कोरोना लस व्हेरिएंट प्रूफ विकसित करता येणार प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग (How to increase immunity) आयुष मंत्रालयानं शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धतींची माहितीही दिली आहे. जसे- दिवसातून एकदा आयुष काढ्याचं सेवन करावं दिवसातून दोनदा हळद मिसळून दूध प्या. 3-5 ग्रॅम अश्वगंधा चूर्ण दिवसातून दोनदा कोमट पाण्यासोबत घ्या. सकाळी 10 ग्रॅम च्यवनप्राश कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत खावं. मधुमेही रुग्णांनी साखरमुक्त च्यवनप्राश घ्यावा. तुळस टाकून उकळलेलं ताजे पाणी प्यावं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Central government, Corona, Coronavirus

    पुढील बातम्या