मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

महाराष्ट्राची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल; आजची रुग्णसंख्याही दिलासादायक

महाराष्ट्राची कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल; आजची रुग्णसंख्याही दिलासादायक

गेल्या अनेक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गेल्या अनेक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गेल्या अनेक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 6 जून : गेल्या अनेक दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 14,433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 55,43,267 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.05% एवढे झाले आहे. आज राज्यात एकूण 12,557 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेत ही संख्या सर्वात कमी आहे. (Coronavirus Update) राज्यात आज 233 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 1.72% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,६५,०८,९६७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५८,३१,७८१ (१५.९७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,४६,३८९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,८५,५२७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. हे ही वाचा-Corona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी देशभरात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेनं सर्वाधिक थैमान महाराष्ट्रात घातलं. महाराष्ट्र आता असं राज्य ठरलं आहे जिथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार होणार आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात केवळ सात देश असे आहेत, जिथे कोरोनामुळे एक लाखाहून अधिकांनी प्राण गमावले आहेत. रविवारची आकडेवारी समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या नावावर हा वाईट रेकॉर्ड नोंदवला जाऊ शकतो. राज्यात शनिवारी कोरोनाचे 13 हजार 659 नवे रुग्ण (Corona Cases in Maharashtra) आढळले आहेत. ही संख्या 10 मार्चनंतरची सर्वात कमी संख्या होती. यादरम्यान राज्यात 300 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 99 हजार 512 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे सोमवारपर्यंत राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार जाण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Corona, Coronavirus cases, Maharashtra News

पुढील बातम्या