मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Virus Updates: महाराष्ट्र Unlock, चीनमध्ये lockdown; एका दिवसात Corona रुग्णांची संख्या दुप्पट

Corona Virus Updates: महाराष्ट्र Unlock, चीनमध्ये lockdown; एका दिवसात Corona रुग्णांची संख्या दुप्पट

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकार अनलॉक जाहीर केलं. मात्र चीनमध्ये (China) अलीकडच्या काळात कोरोना संसर्गाच्या (corona infection)  प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

शांघाय, 03 एप्रिल: जगभरात कोरोना महामारीविरुद्धची (corona epidemic) लढाई अजूनही सुरू आहे. एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकार अनलॉक जाहीर केलं. मात्र चीनमध्ये (China) अलीकडच्या काळात कोरोना संसर्गाच्या (corona infection) प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. देशात 13,146 कोविड प्रकरणे नोंदली गेली आहेत, जी जवळजवळ दोन वर्षांपूर्वी पहिल्या लाटेच्या नंतरची सर्वाधिक प्रकरणे आहेत. शांघायमध्ये एकाच दिवसात विक्रमी 8226 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (National Health Commission) ही माहिती दिली आहे.

अत्यंत पारगम्य ओमायक्रॉन व्हेरिएंट देशातील अनेक प्रांतांमध्ये पसरला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, संसर्गामुळे नवीन मृत्यूची नोंद झाली नाही. त्याचवेळी शांघायमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

शांघायमध्ये वाढत्या लॉकडाऊनमुळे अडचणी वाढल्या

चीनमधील शांघाय शहरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. शहराच्या पूर्वेकडील जिल्ह्यांमध्ये राहणारे लोक आज पाच दिवसांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडणार होते, मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

Women's World Cup Final: मांजरानं जखमी केल्यानं सोडावी लागली होती टीम, वर्ल्ड कप फायनलमध्ये केली कमाल! 

शांघायमधील लाखो लोक सध्या जवळपास दोन वर्षांनंतर अतिशय कडक लॉकडाऊनमधून जात आहेत. 28 मार्च रोजी चीनच्या सर्वात मोठ्या शहरानं ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन टप्प्यात लॉकडाउन सुरू केलं. पूर्व शांघायसाठी सुरुवातीला पाच दिवसांच्या लॉकडाऊनची योजना आखण्यात आली होती, त्यानंतर शहराच्या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पाच दिवसांची बंदी घालण्यात आली होती.

लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना

चिनी आरोग्य अधिकार्‍यांनी 31 मार्च रोजी घोषणा केली की, ते त्याऐवजी पूर्वेकडून निर्बंध उठवतील. पश्चिम शांघायमध्ये आजपासून पाच दिवसांच्या निर्बंधांसह शहराच्या 26 दशलक्ष लोकसंख्येला लॉकडाऊन करण्यास भाग पाडलं गेलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कचरा टाकू नये किंवा कुत्र्यांना बाहेर फिरवता कामा नये हे देखील निषिद्ध आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली असून सर्व अनावश्यक व्यवसाय सध्यातरी बंद ठेवण्यात आले आहेत.

First published:

Tags: China, Corona updates, Coronavirus