Home /News /coronavirus-latest-news /

Maharashtra Corona updates: केवळ 10 दिवसांतच 5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; आज मुंबईत 9330 रुग्ण

Maharashtra Corona updates: केवळ 10 दिवसांतच 5 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; आज मुंबईत 9330 रुग्ण

Maharashtra Covid-19 updates: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील स्थिती आणखीनच चिंताजनक बनत चालली आहे. गेल्या 10 दिवसांत राज्यात मोठ्या प्रमाणात नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

    मुंबई, 10 एप्रिल: महाराष्ट्रात (Maharashtra) सुरू असलेला कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) 'ब्रेक द चेन' अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आणि कठोर निर्बंध लागू केले. मात्र, असे असले तरी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाहीये. यामुळेच आता राज्यात काही दिवस 100 टक्के लॉकडाऊन (Lockdown) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिल महिन्यातील या 10 दिवसांतच राज्यात तब्बल 5 लाखांहून अधिक रुग्णांचे निदान झाले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर राज्यात 1 एप्रिल 2021 ते 10 एप्रिल 2021 या कालावधीत तब्बल 530885 नवीन कोरोना बाधितांचे निदान झाले आहे. ही आकडेवारी चिंतेत भर टाकणारी आहे. एक नजर टाकूयात कुठल्या दिवशी राज्यात किती रुग्णांचे निदान झाले आहे. 1 एप्रिल - 43183 रुग्णांचे निदान 2 एप्रिल - 47827 रुग्णांचे निदान 3 एप्रिल - 49447 रुग्णांचे निदान 4 एप्रिल - 57074 रुग्णांचे निदान 5 एप्रिल - 47288 रुग्णांचे निदान 6 एप्रिल - 55469 रुग्णांचे निदान 7 एप्रिल - 59907 रुग्णांचे निदान 8 एप्रिल - 56286 रुग्णांचे निदान 9 एप्रिल - 58993 रुग्णांचे निदान 10 एप्रिल - 55411 रुग्णांचे निदान हे पण वाचा: 'जनतेला समजावू शकतो पण करोनाला समजावू शकत नाही'; मुख्यमंत्र्यांनी दिले मोठ्या Lockdown चे संकेत महाराष्ट्रातील कोरोनाची सध्यस्थिती काय? राज्यात आज (10 एप्रिल 2021) 55411 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 309 बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात एकूण 53,005 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रिकव्हरी रेट 82.18% इतका झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.72 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,18,51,235 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 33,43,951 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 30,41,080 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 25,297 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 5,36,682 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 55,411 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33,43,951 झाली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या