मुंबई, 23 जून : महाराष्ट्र सध्या राजकीय भूकंपामुळे हादरलेला आहे. त्यातच आता कोरोनाचाही ब्लास्ट झाला आहे (Maharashtra political crisis). कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असताना राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती ढासळली आणि त्यातच कोरोनालाही आपले हातपाय पसरायला मुभा मिळाली (Maharashtra coronavirus update). 24 तासांतच नव्या रुग्णांच्या आकड्याने 5000 चा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात आज गुरुवारी 5,218 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी ही संख्या 3,260 होती. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतच आहेत. मुंबईत काल बुधवारी 1,648 नवे रुग्ण होते, ज्यांची संख्या आज गुरुवारी 2,479 वर पोहोचली आहे. म्हणजे राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी जवळपास निम्मे रुग्ण एकट्या मुंबईतच आहे. आज एका रुग्णाच्या मृत्यूचीही नोंद आहे.
Maharashtra reports 5,218 new coronavirus infections on Thursday including 2,479 in Mumbai and one death: health department. PTI KK KRK
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2022
राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यामुळे कित्येक नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. शिवाय एकाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता. त्याचा परिणाम म्हणून की काय राज्यात कोरोनाचाही भयंकर उद्रेक झाला आहे. कोरोनाचा हादरवणारा आकडा समोर आला आहे.
हे वाचा - सावधान! कोरोनाच्या दहशतीत देशात आणखी 3 खतरनाक Virus; तज्ज्ञांनी केलं Alert
त्यामुळे आता महाराष्ट्र राजकीय आणि आरोग्य अशा दुहेरी संकटात अडकल्याचं दिसतं आहे. त्यामुळे नागरिकांनो आता तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. कोरोनापासून तुम्हीच तुमचा बचाव करायला हवा. कोरोना नियमांचं पालन करायला हवं. स्वतःचा बचाव करण्यासाठी बंधनकारक नसला तरी मास्क वापरायला हवा आणि सोशल डिस्टन्सिंगही राखायला हवं.
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनाही कोरोना
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्री मागच्या 5 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमीत्त भेटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही राजभवनावर जात राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांचा फोटोही व्हायरल झाला होता. दरम्यान दोघे एकमेकांना मास्क न घालता भेटले होते. त्यांना इथेच कोरोनाची लागण झाली, मुख्यमंत्री-राज्यपाल विथाऊट मास्क भेटल्याने ते एकमेकांना कोरोना देऊन गेले असल्याची चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lifestyle, Maharashtra News