मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भारतात कोरोनाची चौथी लाट? नवा Omicron sub-variant BA.2.75 पसरल्याने खळबळ; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच

भारतात कोरोनाची चौथी लाट? नवा Omicron sub-variant BA.2.75 पसरल्याने खळबळ; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा नवा सब-व्हेरिएंट पसरला असल्याचा दावा एका तज्ज्ञाने केला आहे.

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा नवा सब-व्हेरिएंट पसरला असल्याचा दावा एका तज्ज्ञाने केला आहे.

भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा नवा सब-व्हेरिएंट पसरला असल्याचा दावा एका तज्ज्ञाने केला आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 04 जुलै : भारतात कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाचे वेगवेगळे व्हेरिएंट्स पसरत आहेत (Maharashtra corona cases). अशात आता आणखी एका नव्या व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे.  इज्राइलमधील तज्ज्ञाने भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा नवा सब-व्हेरिएंट BA.2.75 पसरला असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. त्यामुळे आता चिंता वाढली आहे (Omicron sub-variant BA.2.75).

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 या सब व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत या व्हेरिएंटच्या 64 रुग्णांची नोंद आहे. त्यात आता BA.2.75 हा आणखी एक नवा व्हेरिएंट आढळल्याने खळबळ उडाली आहे. इज्राइलमधील डॉ. शाय फ्लेशॉन यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी भारतात BA.2.75 Omicron sub-variant पसरल्याचं सांगितलं आहे.

महाराष्ट्रासह 10 राज्यांत प्रकरणं आढळली असून एकूण  69 रुग्ण आहेत. सर्वाधिक 27 रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 13, कर्नाटकात 10, हरयाणात 6, मध्य प्रदेशात 5, हिमाचल प्रदेशात 3, तेलंगणात 2, दिल्ली-जम्मू आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी एक रुग्ण आहे. याबाबत अद्याप भारत सरकारकडून काही माहिती आली नाही.

हे वाचा - Pregnancy planning: गर्भवती महिलांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तीन महिन्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका सर्वांत जास्त

आयएएनच्या रिपोर्टनुसार डॉ. शॉल फ्लेशॉन यांच्या मते या व्हेरिएंटबाबत अभ्यास सुरू आहे. हा किती खतरनाक आहे, ते स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण सुरुवातीच्या लक्षणांवरून हा जीवघेणा असल्याचं दिसतं आहे. शरीरात वेगाने पसरतो आणि वेगवेगळे अवयवांना हानी पोहोचवतो.

भारतासह हा व्हेरिएंट आणखी काही देशात आहेत. यूकेमध्ये 6, जर्मनी-कॅनडा-यूएसमध्ये प्रत्येकी 2 आणि जपान-ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये प्रत्येकी एक प्रकरण आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची सद्यस्थिती

राज्याच्या आरोग्य विभागाने रविवारी दिलेल्या आकडेवारीनुसार 2,962 नवीन प्रकरणाची नोंद झाली. त्यापैकी 761 रुग्ण मुंबईतील आहेत. तर 6 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आता एकूण 79,85,296 कोरोना रुग्णांची नोंद आहे, तर मृत्यूचा आकडा 1,47,940 झाला आहे. मृत्यू दर 1.85 टक्के आहे.

रविवारी दिवसभरात 3,918  रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 78,14,871. रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेट 97.87 आहे. तर सध्या अॅक्टिव केसेस म्हणजे ज्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत असे 22,485 रुग्ण आहेत.

हे वाचा - फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल 

ओमिक्रॉनच्या BA.4  आणि  BA.5 व्हेरिंटचे 64 रुग्ण राज्यात आहेत. त्यापैकी सर्वाधिक 34 मुंबई आणि 15 पुण्यात आहेत. नागपूर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये प्रत्येकी 4 रुग्ण आहेत.

First published:

Tags: Coronavirus