Home /News /coronavirus-latest-news /

Corona: महाराष्ट्रातील मृतांच्या आकडेवारीची 1 लाखाकडे वाटचाल, 7 देशांची बरोबरी करणार राज्य

Corona: महाराष्ट्रातील मृतांच्या आकडेवारीची 1 लाखाकडे वाटचाल, 7 देशांची बरोबरी करणार राज्य

महाराष्ट्र आता असं राज्य ठरलं आहे जिथे कोरोनामुळे (Coronavirus) होणाऱ्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार होणार आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात केवळ सात देश असे आहेत, जिथे कोरोनामुळे एक लाखाहून अधिकांनी प्राण गमावले आहेत.

    मुंबई 06 जून: देशभरात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) ओसरताना दिसत आहे. दुसऱ्या लाटेनं सर्वाधिक थैमान महाराष्ट्रात घातलं. महाराष्ट्र आता असं राज्य ठरलं आहे जिथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार होणार आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात केवळ सात देश असे आहेत, जिथे कोरोनामुळे एक लाखाहून अधिकांनी प्राण गमावले आहेत. रविवारची आकडेवारी समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या नावावर हा वाईट रेकॉर्ड नोंदवला जाऊ शकतो. राज्यात शनिवारी कोरोनाचे 13 हजार 659 नवे रुग्ण (Corona Cases in Maharashtra) आढळले आहेत. ही संख्या 10 मार्चनंतरची सर्वात कमी संख्या होती. यादरम्यान राज्यात 300 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 99 हजार 512 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. यामुळे सोमवारपर्यंत राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा एक लाखाच्या पार जाण्याची शक्यता आहे. नातेवाईकांसाठी भलताच खटाटोप; आरोग्य कर्मचाऱ्यानं नगरमधून चोरली लस आतापर्यंत या सात देशांमध्ये एका लाखाहून अधिक मृत्यू - जगभरात केवळ सातच देश असे आहेत जिथे एका लाखाहून अधिकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. यात भारताचाही समावेश आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या कोविड ट्रेकरनुसार, याबाबतीत सर्वात पहिला नंबर अमेरिकेचा लागतो. याठिकाणी कोरोनामुळे 5 लाख 97 हजार 377 जणांनी आपला जीव गमावला आहे. यानंतर भारतात 3 लाख 46 हजार 759, ब्राझीलमध्ये 4 लाख 72 हजार 531, यूनायटेड किंगडम 1 लाख 28 हजार 99, इटली 1 लाख 26 हजार 472, रशिया 1 लाख 21 हजार 365 आणि फ्रान्समध्ये 1 लाख 10 हजार 135 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. Corona Updates: देशातल्या कोरोना व्हायरस संदर्भातील मोठी बातमी महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यातील एकूण बाधितांची संख्या 58,19,224 आणि मृतांची संख्या 99,512 वर पोहोचली आहे. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या 20,000 पेक्षा कमी आली आहे. सध्या राज्यात 1,88,027 रुग्णांवर उपाचार सुरू आहेत. शनिवारच्या आकडेवारीनुसार, देशभरात कोरोनानं 3 लाख 46 हजार हून अधिक रुग्णांनी जीव गमावला आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. देशातील एकूण मृतांच्या संख्येतील 29 टक्के मृत एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या