मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

राज्याला मोठा दिलासा! दिवसभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट

राज्याला मोठा दिलासा! दिवसभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत घट

लोकांना या आजाराबाबत माहिती देण्यासाठी ऑनलाइन कौन्सिलिंग केले जात आहे. ब्रुसेलोसिस हा असा आजार आहे जो बॅक्टेरियामुळे होतो. 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्ट 2019 पर्यंत झोन्गमू लॉन्झोउ बायोलॉजिकल फार्मास्युटिकल फॅक्ट्रीने या ब्रुसेला लस तयार करण्यासाठी एक्सपायर्ड डिसइंन्फेक्टेडचा उपयोग केला. या लशीचा उपयोग प्राण्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

लोकांना या आजाराबाबत माहिती देण्यासाठी ऑनलाइन कौन्सिलिंग केले जात आहे. ब्रुसेलोसिस हा असा आजार आहे जो बॅक्टेरियामुळे होतो. 24 जुलै 2019 ते 20 ऑगस्ट 2019 पर्यंत झोन्गमू लॉन्झोउ बायोलॉजिकल फार्मास्युटिकल फॅक्ट्रीने या ब्रुसेला लस तयार करण्यासाठी एक्सपायर्ड डिसइंन्फेक्टेडचा उपयोग केला. या लशीचा उपयोग प्राण्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 50 ते 70 कोरोना रुग्णांचा मृत्यू होत होता. आज पहिल्यांदाच हा आकडा घसरला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 10 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसभरातील कोरोना (maharashtra coronavirus) रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पन्नासपेक्षा जास्त होता. मात्र आज पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना बळींची नोंद झाली आहे. मृत्यू झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या चाळीसपेक्षाही खाली आहे. त्यामुळे राज्याला हा मोठा दिलासा आहे.

राज्य सरकारनं रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात 34 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.54% झाला आहे. गेले काही दिवस मृत्यूदर हा 2.55% टक्के होता. आतापर्यंत एकूण 50061 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याची 10 जानेवारीची आकडेवारी

राज्यातील एकूण कोरोना रुग्ण - 19,69,114

उपचार घेत असलेले रुग्ण - 54,179

दिवसभरात नव्या रुग्णांची नोंद - 3,558

दिवसभरात बरे झालेले रुग्ण - 2,302

एकूण बरे झालेले रुग्ण - 18,63,702

रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) - 94.65%

दिवसभरातील मृत्यू - 34

एकूण मृत्यू -  50,061

राज्यातील मृत्यू दर - 2.54%

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात 11 रुग्ण

यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे भारतात 90 रुग्ण आहेत. त्यापैकी 11 रुग्ण महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 2 आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे. दरम्यान मुंबईत गुजरात आणि गोव्यातील प्रत्येकी एका रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

हे वाचा - मुंबईजवळ भयंकर रुपाचा Coronavirus सापडला; अँटिबॉडीलाही देतोय चकवा

दरम्यान भारतात यूकेतील कोरोना स्ट्रेनची दहशत असताना आता दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेनही महाराष्ट्रात आढळला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार  खारघरमधील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील असे तीन रुग्ण आहेत, ज्यांच्यामध्ये  E484K म्‍युटेशन असलेला कोरोना व्हायरस सापडला आहे.

हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोनाव्हायरस असल्याचं सांगितलं जातं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. तीन रुग्णांपैकी रुग्ण ठाण्यातील आणि एक रायगडमधील आहे.

First published:

Tags: Coronavirus