चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

चिंताजनक! राज्यात पुन्हा वाढू लागते कोरोना बळी

दोन दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाच्या मृत रुग्णांची संख्या कमी झाली होती. हा आकडा आता पुन्हा वाढू लागला आहे.

  • Share this:

पुणे, 12 जानेवारी : दोन दिवसांपूर्वी राज्यात पन्नासच्या खाली गेलेला कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा आता पुन्हा पन्नासीवर पोहोचला आहे. दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या (maharashtra coronavirus) मंगळवारच्या (12, सप्टेंबर 2021) आकडेवारीनुसार, राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.54% आहे.

दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं आता एकूण मृत्यूची संख्या 50,151 झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दिवसभरातील कोरोना  रुग्णांच्या मृत्यूचा आकडा पन्नासपेक्षा जास्तच होता. हा आकडा दोन दिवसांपूर्वीच चाळीसपेक्षाही खाली गेला होता. पण पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.

राज्यातील 12, सप्टेंबर 2021 कोरोना रुग्णांची आकडेवारी

राज्यातील एकूण कोरोना रुग्ण - 19,74,488

उपचार घेत असलेले रुग्ण - 51,892

दिवसभरात नव्या रुग्णांची नोंद - 2,936

दिवसभरात बरे झालेले रुग्ण - 3,282

एकूण बरे झालेले रुग्ण - 18,71,270

रुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) - 94.77%

दिवसभरातील मृत्यू - 50

एकूण मृत्यू -  50,151

राज्यातील मृत्यू दर - 2.54%

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे 11 रुग्ण

यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे महाराष्ट्रात 11 रुग्ण आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी 3, पुण्यात 2 आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे. दरम्यान मुंबईत गुजरात आणि गोव्यातील प्रत्येकी एका रुग्णावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

Published by: Priya Lad
First published: January 12, 2021, 8:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading