Home /News /coronavirus-latest-news /

फक्त पुणे-मुंबईतच नाही तर ग्रामीण भागात पसरतोय कोरोना! Sero सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो आणखी भीषण

फक्त पुणे-मुंबईतच नाही तर ग्रामीण भागात पसरतोय कोरोना! Sero सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो आणखी भीषण

पुण्यात गुरुवारी दिवसभरात नवे 1764 रूग्ण आढळून आलेत तर 48 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

पुण्यात गुरुवारी दिवसभरात नवे 1764 रूग्ण आढळून आलेत तर 48 जणांचा मृत्यू झाला. तर दिवसभरात 1188 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला.

सिरो सर्व्हेचा (Sero Survey) पहिला अहवाल पाहूनच धडकी भरली आहे, आता दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे, मात्र हा दुसरा अहवाल किती भीषण असू शकतो याचं चित्र महाराष्ट्रातील आकडेवारीवरूनच समोर येतं आहे.

  मुंबई, 12 सप्टेंबर : इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) पहिल्या राष्ट्रीय सिरो सर्व्हे (Sero Survey)अहवाल जारी केला आणि या अहवालामुळे धक्काच बसला. मे महिन्याच्या सुरुवातीलाच तब्बल 64 लाख लोकांना कोरोना संक्रमण झाल्याचं समोर आलं. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं एकही प्रकरण समोर आलं नाही. त्या जिल्ह्यांमध्येही संसर्ग पसरल्याचं सेरो सर्व्हेमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात असलेल्या कोरोना रुग्णांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सिरो सर्व्हेचा पहिला अहवाल जाहीर झाल्यानंतर आता दुसऱ्या अहवालाकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला ही आकडेवारी समोर येईल. मात्र त्याआधीच वास्तव रूप महाराष्ट्रात दिसू लागलं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 20 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून येत आहेत. 12 सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार, दिवसभरात 22,084 नवे रुग्ण आढळले. तर 391 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 10,37,765 एवढी झाली आहे. तर मृत्यूसंख्या 29,115 एवढी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.  फक्त मुंबई, पुण्यातच नाही तर आता ग्रामीण भागातही कोरोना पसरू लागला आहे. जिल्हा      एकूण रुग्ण       अॅक्टिव्ह रुग्ण मुंबई         167656             29176 ठाणे          154994             28768 पुणे            228416              75610 नागपूर        48903            21727 कोल्हापूर    32137               9193 सातारा       23409                8263 सांगली        23856               9556 जळगाव      36009               9126 नाशिक        53684           12084 रुग्णसंख्या वाढण्यास पूर्ववत झालेले व्यवहार, वाढणारी गर्दी, लोकांचा बेफिकीरपणा, मास्क न लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं ही मुख्य कारणं आहेत असा तज्ज्ञांचा दावा आहे. हे वाचा - भारतात रुग्णसंख्या जास्त, पण मृत्यूदर सर्वात कमी; काय आहे या आकड्यांमागची खरी गोष्ट? संपूर्ण भारतात सध्या 60 लाखांहून आधिक रुग्ण असून महाराष्ट्रातच यातले 10 लाखांवर Covid रुग्ण आहेत.  जवळपास 75 हजार रुग्णांचा मृत्यू देखील देशात झाला आहे. कोरोनारुग्णांची ही मृत्यूसंख्या जगभरात तिसऱ्या क्रमांकाची आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, भारतात सर्वाधिक रुग्णसंख्या असली तरीदेखील मृत्यूदर सर्वात कमी आहे. त्यामुळे जगभरात सर्वात जास्त मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरीदेखील एकूण रुग्णांच्या तुलनेत भारतात मृत्यूदर आटोक्यात आहे, असं आकडेवारी सांगते. पण तज्ज्ञांच्या मते ही, आकडेवारी फसवी असून भारतात आरोग्य व्यवस्था तोकडी आहे. हे वाचा - WHO म्हणतं, कोरोना विरुद्ध कसं लढावं हे जगाने पाकिस्तानकडून शिकावं! कोरोनाच्या मोठ्या प्रमाणात टेस्ट होत नसल्यामुळे (Covid test) अनेक मृत्यू कशामुळे झाले आहेत हे समोर येत नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे की नाही हे समजत नाही. अनेक रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसून यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा संदिग्ध अवस्थेतल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असू शकतो. त्यामुळे कोरोनाचा मृत्यूदर जेवढा कमी असल्याचं दाखवलं जातं, तेवढा तो खराच कमी आहे का याचा कोणताही ठोस पुरावा भारताच्या आरोग्य विभागाकडे नाही. हे वाचा - Good News: Oxfordच्या कोरोना लशींच्या चाचण्यांवरची बंदी उठवली, भारतालाही फायदा त्यामुळे तज्ज्ञांनी भारतातील कोरोनाबाबत सांगितलेली ही वास्तव परिस्थिती आणि सिरो सर्व्हेचा पहिला रिपोर्ट यानंतर दुसरा रिपोर्टमध्ये किती भयावह आकडेवारी असू शकते, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Coronavirus

  पुढील बातम्या