कालच्या विक्रमी रुग्णसंख्येनंतर आज काय आहे महाराष्ट्रातली कोरोना स्थिती? आकडे आले समोर

कालच्या विक्रमी रुग्णसंख्येनंतर आज काय आहे महाराष्ट्रातली कोरोना स्थिती? आकडे आले समोर

राज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आकडा आजही 8 हजारांच्या पार आहे, पण किंचितसा दिलासाही आहे.

  • Share this:

मुंबई, 25 फेब्रुवारी : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा (coronavirus in maharashtra) आकडा गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. या वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली ती 24 फेब्रुवारीला. या दिवसात सर्वात जास्त म्हणजे तब्बल 8 हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण दिसून आले. तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आजही नव्या कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजाराच्या पलीकडेच आहे. पण कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या कमी झाली आहे आणि मृत्यूचं प्रमाणही कमी झालं आहे. हा मोठा दिलासा आहे.

राज्याच्या आरोग्य विभागानं आज (25 फेब्रुवारी) जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात 8,702 कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. काल 8807 रुग्णांची नोंद झाली होती. तर काल 80 रुग्णांचा मृत्यू झाला होता, आज मृत्यूचा आकडा 56 वर आला आहे. त्यामुळे मृत्यूदरही एक टक्क्याने घसरून 2.44 टक्क्यांवर आला आहे.

राज्यातील 25 फेब्रुवारीची कोरोना रुग्णांची आकडेवारी

एकूण रुग्ण - 21,29,821

उपचार घेत असलेले रुग्ण - 64,260

दिवसभरातील नवे रुग्ण - 8,702

दिवसभरात बरे झालेले रुग्ण - 3,744

एकूण बरे झालेले रुग्ण - 20,12,367

रुग्ण बरे होण्याचं प्रमाण - 94.49%

मृत्यूचं प्रमाण - 2.44 %

हे वाचा - राज्यात का होतोय कोरोनाचा उद्रेक? सरकारनं सांगितली 3 कारणं

सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाण्यात कोरोना थैमान घालत होता. त्यानंतर विदर्भ, मराठवाड्यातही कोरोनाचा उद्रेक झाला. गेल्या दोन आठवड्यात विभागात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. सर्वाधिक लक्ष द्यावेत असे जिल्हे विदर्भातले असले आणि रुग्णवाढ सर्वाधिक प्रमाणात याच विभागात झालेली असली तरी कोरोनामुळे मृत्यूचं थैमान वाढलं आहे कोकण आणि मराठवाड्यात.

हे वाचा - कोरोना लस हवी पण इंजेक्शनची भीती वाटतेय; तुमच्यासाठी आता कोरोना टॅबलेट

राज्यात कोरोनाचे दोन नवे स्ट्रेनही आढळून आले आहेत पण यामुळेच कोरोना संसर्गाचा वेग वाढला असावा, असे काही वैज्ञानिक पुरावे अद्याप सापडले नाही आहेत, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. दरम्यान होम क्वारंटाइन (home quarantine) आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (social distancing) नियमांचं उल्लंघन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पुरेसा स्रोत उपलब्ध न होणं ही राज्यातील कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्याची  कारणं आहेत. अशी माहिती राज्याच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Published by: Priya Lad
First published: February 25, 2021, 8:42 PM IST

ताज्या बातम्या