मुंबई, 10 जून : कोरोनाला (Coronavirus) आळा घालण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमधून राज्य हळू हळू अनलॉक (Unlock) होत आहे. मात्र कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा काळजी तर वाढवणार नाही ना, अशी भीती निर्माण होत आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं पाहायला मिळत असताना. राज्यात काही ठिकाणी परिस्थिती पुन्हा बिघडत आहे असं दिसतंय. गुरुवारी (Thursday 10th June Corona Update) तर कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा आणि मृतांचा आकडाही वाढलेला पाहायला मिळाला.
(वाचा-अरे देवा! कोरोनानंतर भारतात आणखी एक जीवघेणा व्हायरस! इथं सापडला पहिला रुग्ण)
राज्यात गुरुवारी नव्याने आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 207 एवढा आहे. तर कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा हा चक्क नव्या रुग्णांपेक्षा कमी म्हणजे 11 हजार 449 एवढा असल्याचं पाहायला मिळालं. राज्याची चिंता वाढण्याचं कारण ठरलेला कोरोनाच्या मृतांचा आकडा गुरुवारीदेखिल पुन्हा मोठा असल्याचं दिसून आलं. गुरुवारी कोरोनामुळं राज्यात 393 जणांनी प्राण गमावल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं कोरोनाच्या आकड्यांमध्ये चिंता वाढवणारी अशी वाढ असल्याचं पाहायला मिळत आहे.
(वाचा-हे काय! पुण्यात कोरोनाकाळात वाढले पुरुषांवरील कौटुंबीक हिंसाचार, समोर आले आकडे)
राज्यात अहमदनगर, कोल्हापूर, रायगड अशा काही हॉटस्पॉटमुळं अजूनही प्रशासनासमोरच्या चिंता कायम आहे. विशेषतः गुरुवारची रायगडची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं पाहायला मिळालं. रायगडमध्ये गुरुवारी तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला. तर मीरा भाईंदर मनपा क्षेत्रात 33 मृत्यू झाले. कोल्हापूर, नगरची स्थितीही अद्याप हवी तशी सुधारत नसल्याचं दिसत आहे.
कोरोनाच्या संकटातून पूर्ण बाहेर पडण्यासाठी अद्याप वेळ लागणार असल्याचं सध्या तरी आकड्यांवरून दिसत आहे. सरकारनं अनलॉक करायला सुरुवात केली आहे. पण आकडे जर पुन्हा वाढताना दिसले तर सरकराच्या चिंता अधिक वाढणार आहेत. त्यामुळं सर्वांनी काळजी घेऊन सरकारला मदत करणं अपेक्षित आहेत. गुरुवारची आकड्यांची वाढ दिसायला फार मोठी नसली तरी, मुळात वाढ होणंच चिंताजनक असल्यानं काळजी घेणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra News