मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /मुंबईत कोरोनाचा भयंकर विस्फोट! एकाच दिवसात शहरातील नव्या रुग्णांचा आकडा दुप्पट

मुंबईत कोरोनाचा भयंकर विस्फोट! एकाच दिवसात शहरातील नव्या रुग्णांचा आकडा दुप्पट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Mumbai recorded double covid new patient in one day : राज्यातील दिवसभरातील नव्या एकूण रुग्णांच्या 65 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतच आहेत.

मुंबई, 07 जून : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला होता तोच आता आता राज्यात कोरोनाची चौथी लाट येते की काय अशी धास्ती निर्माण झाली आहे.  दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (maharashtra corona cases) वाढतच चालली आहे. राज्यात आज एकाच दिवसात 1881  रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 1242  रुग्ण मुंबईतील आहेत (Mumbai corona cases). धक्कादायक म्हणजे एकाच दिवसात मुंबईतील नव्या रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे (Double corona patinet in Mumbai).

राज्यात 7 जून 2022 रोजी 1881 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1242 रुग्ण एकट्या मुंबईत आहे. याचा अर्थ राज्यातील नव्या एकूण रुग्णांच्या जवळपास 65 टक्के रुग्ण मुंबईतच आहेत. धक्कादायक म्हणजे एकाच दिवसात मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. बीएमसीच्या 06 जून 2022 च्या आकडेवारीनुसार शहरात 676 नवे रुग्ण आढळले. आज 7 जून 2022 ला हा आकडा 1242 वर पोहोचला आहे. त्यामुळे ही नक्कीच धोक्याची घंटा आहे.

राज्यात 5 जिल्हे कोरोना हॉटस्पॉट

राज्यातील 5 जिल्ह्यात गेल्या 7 दिवसांत तब्बल 130 टक्के रूग्णाची वाढ झाली आहे. मुंबईसह  पालघर, ठाणे, रायगड, पुणे हे 5 जिल्हे नवे हॉटस्पॉट ठरत आहे.

हे वाचा - ऐतिहासिक यश! सर्व रुग्णांचा कॅन्सर काही दिवसांतच पूर्णपणे 'गायब'; फक्त एका औषधानेच केला चमत्कार

मागील सात दिवसांमध्ये राज्यात तब्बल  130 टक्के रूग्णाची वाढ झाली आहे.  मुंबईत 135 टक्के रूग्ण वाढ,  पालघर 350,  ठाणे 191 टक्के, पुणे 50 टक्के आणि रायगडमध्ये 130 टक्के वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्यातील 5 जिल्ह्यांतील आकडेवारी

मुंबई

३० मे ते ५ जून-- ४,८८०रुग्ण

२३ मे ते २९ मे-- २०७० रुग्ण

१३५.७५% वाढ

ठाणे

३० मे ते ५ जून--१,२४५ रुग्ण

२३ मे ते २९ मे--४२७ रुग्ण

१९१.५७% वाढ

पुणे

३० मे ते ५ जून-- ५३८ रुग्ण

२३ मे ते २९ मे-- ३५७

५०.७०% वाढ

रायगड

३० मे ते ५ जून-- २४४ रुग्ण

२३ मे ते २९ मे--१०६ रुग्ण

१३०.१९% वाढ

पालघर

३० मे ते ५ जून--१४४ नवे रुग्ण

२३ मे ते २९ मे-- ३२ नवे रुग्ण

३५०.००% वाढ

या रुग्णांमध्ये 1.04  टक्के गंभीर रुग्ण आहे. फक्त 4.31% रुग्णांमध्ये लक्षणं आहेत तर 95 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं नाहीत.

केंद्र सरकारचं ठाकरे सरकारला पत्र

कोरोना प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, केंद्र सरकारने महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र लिहून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यास आणि कडक उपाययोजना राबविण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते.

हे वाचा - तुमची एक वाईट सवय सोडा आणि 40 हजार रुपये मिळवा; सरकारने दिली जबरदस्त ऑफर

गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 नवीन प्रकरणं नोंदवली गेली असून, 3 जून रोजी आठवड्यातील रुग्णसंख्या 21,055 झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 0.52 टक्के होता तो जूनच्या पहिल्या आठवड्यात 0.73 टक्के झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Maharashtra News, Mumbai